२८ जुलै - दिनविशेष &स्मृतिदिन

 

 

ACTIVE AND ADVANCED EDUCATION ALl TYPES:

************

२८ जुलै - अभिनेत्री कुमकुम स्मृतिदिन

************

 

जन्म - २२ एप्रिल १९३४ (बिहार)

स्मृती - २८ जुलै २०२० (मुंबई)

 

अभिनेत्री कुमकुम यांचा जन्म २२ एप्रिल १९३४ रोजी हुसेनाबाद, झारखंड बिहार येथे झाला.

 

कुमकुम, यांना पाच सहा चित्रपट सोडले तर मुख्य नायिका म्हणून कधीच काम मिळाले नाही. कुमकुम यांचे खरं नाव झेबुन्निसा, त्यांचे वडील सय्यद मन्सूर हसन पटणीचे नबाब होते. त्यांच्या वडिलाची हुसेनाबाद येथे खूप जमीन जायदाद होती. पण सरकारने जप्ती आणल्यावर ते पूर्ण कफल्लक झाले. मग कोलकत्ता येथे रहायला आले.

 

कुमकुम यांना लहानपणापासून नृत्य गाणे तसेच अभिनयाची खूप आवड होती. त्यांनी पं. शंभू महाराज यांच्याकडून कथ्थकाचे शिक्षण घेतले होते. ५० च्या दशकात कुमकुम यांनी चित्रपट सृष्टीत प्रवेश केला. कुमकुम यांना पहिली संधी सोहराब मोदींनी त्यांच्या 'मिर्जा गालीब' या चित्रपटात दिली. पण कुमकुम यांना खरी ओळख मिळाली ती गुरुदत्त यांच्या आर पार' या चित्रपटातील कभी आर कभी पार लागा तीरे नजरया गाण्यामुळे. कुमकुम यांनी मि & मिसेस 55’ मध्ये गुरुदत्तंच्या वहिनीची भूमिका केली. त्यांचे झेबुन्निसाहे नाव गुरुदत्त यांनी बदलून कुमकुमहे नाव ठेवले. 

 

'सीआयडी' मध्ये त्यांनी जॉनी वॉकर च्या प्रेयसीची भूमिका केली होती. कुमकुम यांचा शेवटचा चित्रपट 'जलते बदन' हा होता. कुमकुम यांनी ११५ हून अधिक चित्रपटात काम केले. कुमकुम यांनी काही भोजपुरी चित्रपटही केले आहे. १९७३ मध्ये कुमकुम यांनी व्यावसायिक सज्जाद अकबर खान यांच्याशी विवाह केला आणि त्या सौदी अरेबिया येथे स्थायिक झाल्या.कुमकुम या अभिनेता गोविंदा यांच्या मावशी आहेत.

 

कुमकुम यांचे काही हिंदी चित्रपट- राजलक्ष्मी, मि & मिसेस 55, सीआयडी, मदर इंडिया, उजाला, बसंत बहार, मि. एक्स इन बॉँबे, गंगा की लहरे, श्रीमान फंटूश, दिल भी तेरा हम भी तेरे, ललकार, धमकी. कुमकुम यांचे भोजपुरी चित्रपट- गंगा मैया तोहे पिहरी चढई बो,लागी नाही छूटे राम.

 

संजीव वेलणकर, पुणे

 

************

 

************

२८ जुलै - अभिनेता जगदीश राज स्मृतिदिन

************

 

जन्म - १९२८ (पाकिस्तान)

स्मृती - २८ जुलै २०१३

 

पाकिस्तानातील सरगोधा येथे जन्म झालेले जगदीश राज फाळणीनंतर भारतात स्थायिक झाले. जगदीश राज खुराणा हे जगदीश राज यांचे पूर्ण नाव.

 

जगदीश राज यांनी दीडशेहून अधिक चित्रपटात विविध भूमिका केल्या मात्र ते पोलीसअधिकाऱ्याच्या भूमिकेत विशेष गाजले. तब्बल १४४ चित्रपटा मधून त्यांनी पोलीस अधिकाऱ्याची भूमिका वठविली होती. सिनेक्षेत्रातील २१ वर्षांच्या कारकिर्दीत एकाच प्रकारच्या व्यक्तिरेखा साकारण्याचा विक्रम जगदीश राज यांच्या नावावर आहे. त्यांच्या या भूमिकांची गिनिज् बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंद घेण्यात आली होती.

 

बहुतांश हिंदी चित्रपटातून त्यांनी रंगविलेली पोलीस अधिकारीही भूमिका गाजली. मजदूर, इनाम धरम, गोपीचंद जासूस, सिलसिला, बेशरम, तुम्हारी कसम, सुहाग, ड्रीम गर्ल, गुलामी, असली नकली, विरोधी, चार दिन की चांदनी; आदी चित्रपटातील त्यांच्या भूमिका गाजल्या होत्या. जगदीश राज हे अभिनेत्री अनीता राज यांचे वडील.

 

जगदीश राज यांचे २८ जुलै २०१३ रोजी निधन झाले.

 

संजीव वेलणकर, पुणे

९३२२४०१७३३

 

संदर्भ. इंटरनेट

 

************

 

************

२८ जुलै - अभिनेत्री लिला नायडू स्मृतिदिन

************

 

जन्म - १९४०

स्मृती - २८ जुलै २००९

 

लीला नायडू यांचे पिता, डॉ. रामैय्या नायडू एक ख्यातनाम अणु संशोधक होते तर आई स्विस ची. त्यांच्या कडूनच लीला नायडू यांना भारतीय आणि युरोपियन मिश्रित सौंदर्याचा वारसा मिळाला होता.  लिला नायडू यांनी १९५४ साली 'मिस इंडिया' हा बहुमान पटकावला होता. बलराज साहनी यांच्या 'अनुराधा' चित्रपटापासून नायडू यांनी १९६० मध्ये चित्रपटातील कारकिर्दीस प्रारंभ केला होता.

 

"वोग" (Vogue) सारख्या आंतरराष्ट्रीय आणि ख्यातनाम मासिकाने १९५०-६० च्या दशकात या आकर्षक आणि डौलदार व्यक्तिमत्वाच्या धनी असलेल्या अभिनेत्रीचा समावेश "जगातील १० अति सुंदर" महिलांमध्ये केला होता. हृषीकेश मुखर्जी यांनी डायरेक्ट केलेला 'अनुराधा' हा लीला नायडू यांचा बॉलीवूड मधील पहिला चित्रपट. या चित्रपटात त्यांनी अशा एकाकी पडलेल्या पत्नीची भूमिका अतिशय उठावदार पणे केली कि जी आपले सारे गानविश्वातील करिअर आपल्या डॉक्टर पतीकरता (बलराज सहानी) करिता सोडून देते. या चित्रपटाची गणना एका महान बॉलीवूड चित्रपटा मध्ये होते. पंडित रविशंकर यांनी दिलेले श्रवणीय संगीत (जाने कैसे सपनोमे, कैसे दिन बीते इ. गाणी) आणि बलराज सहानी यांचा दमदार अभिनय या चित्रपटाच्या इतर जमेच्या बाजू. या चित्रपटाला १९६१ चा भारत सरकारचा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार आणि बर्लिन आंतराराष्ट्रीय फिल्मोत्सव पुरस्कार मिळाला.

 

'येह रास्ते हैं प्यारके' हा त्यांचा अजून एक गाजलेला चित्रपट (१९६३). या चित्रपटाची कथा त्या वेळच्या गाजलेल्या 'नानावटी प्रेमप्रकरण' यावर आधारित होती. या चित्रपटात सुनील दत्त, रेहमान आणि लीला नायडू यांनी हा प्रेमाचा त्रिकोण अतिशय समर्थपणे साकारला आहे. खरे तर, ही अपारंपारिक भूमिका स्वीकारावयास त्या वेळच्या कोणत्याही प्रसिद्ध नायिका तयार नव्हत्या. पण लीला नायडू यांचा दाखविलेला धीटपणा त्यांच्या चांगलाच उपयोगी पडला आणि हा चित्रपट हिट ठरला.

 

पहिल्या दोन-तीन चित्रपटांनंतर ओबेरॉय हॉटेल समूहाच्या तिलकराज ओबेरॉय यांच्याशी विवाह करून त्यांनी चित्रपटसृष्टी सोडली. पुढे घटस्फोट झाला आणि पत्रकार डॉम मोराएस यांच्याशी लिला नायडू यांनी विवाह केला. दहा वर्षे ती हाँगकाँग मध्ये राहिल्या. तिथे त्यांनी काही रेडिओ प्रोग्रॅम केले. तिथल्या चित्रपटासाठी डबिंगही ती करीत असे.

 

त्यांनी आपल्या जीवनाची शेवटची काही वर्षे एकाकीपाणेच घालविली. या एकटेपणात त्यांना जे. कृष्णमुर्ती यांच्या शिकवणुकीची खूप साथ मिळाली. बऱ्याच काळानंतर श्याम बेनेगल यांच्या त्रिकालमध्ये गोव्यातल्या कॅथलिक ख्रिश्चन कुटुंबातल्या वर्चस्व गाजविणाऱ्या कर्त्यां प्रौढ स्त्रीची मध्यवर्ती भूमिका तिने केली. १९९२ सालचा प्रदीप किशन दिग्दर्शित इलेक्ट्रिक मूनहा इंग्रजी चित्रपट त्यांचा शेवटचा चित्रपट.

 

जेम्स आईव्हरी यांचा The householder (१९६३) आणि श्याम बेनेगल यांचा 'त्रिकाल' (१९८५) हे लीला नायडू यांचे इतर गाजलेले चित्रपट. श्याम बेनेगल तर लीला नायडू यांच्या अभिनया बद्दल म्हणतात, "It was a sheer haunting experience to work with Leela Naidu, who breethed innocence and serenity in her performance”.

 

परंतु, इतक्या प्रतिभाशाली अभिनेत्रीला केवळ बोटावर मोजण्या इतकेच चित्रपट मिळाले. कदाचित त्यांचे स्वतंत्र व्यक्तिमत्व आणि तेजस्वी प्रतिभा त्यांच्या प्रगतीआड आली असावी.

 

लीला नायडू यांचे २८ जुलै २००९ निधन झाले.

 

मा. लीला नायडू यांना आदरांजली !

 

संजीव वेलणकर, पुणे

९३२२४०१७३३

 

संदर्भ : इंटरनेट

 

************

 

************

२८ जुलै - अभिनेत्री आयशा जुल्का चा वाढदिवस

************

 

जन्म - २८ जुलै १९७२ (श्रीनगर)

 

अभिनेत्री आयशा जुल्काचा आज वाढदिवस !

 

खिलाडी, जो जीता वही सिकंदर, बलमा, रंग आणि  वक्त हमारा है यांसारख्या सुपरहिट बॉलिवूड सिनेमांमध्ये झळकलेली आयशा जुल्का चे २००३ मध्ये बॉलीवुड मध्ये करिअर जवळजवळ संपुष्टात आले होते. याकाळात ती सिनेमांमध्ये मुख्य नायिकेच्या नव्हे तर सहायक अभिनेत्रीच्या रुपात झळकू लागली होती. याचकाळात तिने लग्नाचा निर्णय घेतला.

 

२००३ मध्ये आयशाने समीर वाशी यांच्याशी लग्न केले. समीर बिझनेसमॅन असून त्यांचा कन्स्ट्रक्शनचा बिझनेस आहे. त्यांना रिअल इस्टेट टायकून म्हणून ओळखले जाते.

 

मुंबईतील अंधेरी स्थित तिरुपती अपार्टमेंटमध्ये आयशा आपल्या कुटुंबासोबत राहते. या दाम्पत्याला एक मुलगी असून तिचे नाव स्नेह जुल्का आहे.

 

संजीव वेलणकर, पुणे

९४२२३०१७३३

 

संदर्भ : इंटरनेट

 

************

 

************

२८ जुलै - अभिनेता धनुष चा वाढदिवस

************

 

जन्म - २८ जुलै १९८३

 

अभिनेता धनुषचा आज वाढदिवस.

 

अभिनेता धनुष कोलावरी डीया गाण्याने प्रसिद्धी झोतात आला. धनुष हा सुपरस्टार रजनीकांत यांचा जावई आहे. धनुषचे खरे नाव वेंकटेश प्रभू कस्तुरी राजा आहे. साऊथ सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध दिग्दर्शक कस्तुरी राजा यांचा तो मुलगा आहे. वयाच्या १६ व्या वर्षी धनुषने  वडिलांच्या थुल्लुवाधो इलामाईया सिनेमा द्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. पुढे रांझणाआणि षमिताभया बॉलिवूड चित्रपटांतही तो झळकला.

 

खरे तर धनुषला अभिनयात अजिबात रस नव्हता. धनुषचे वडील कस्तूरी राजा मोठे दिग्दर्शक होते. त्यामुळे त्यांच्या घरात सतत साऊथच्या दिग्गज अभिनेत्यांनी ये-जा असे. पण कुठलाही अ‍ॅक्टर आला की, धनुष स्वत:ला एका खोलीत कोंडून घेई. यानंतर वडील आणि भावाने धनुषला कसेबसे अभिनयासाठी राजी केले.

 

धनुष म्हणायला मोठ्या दिग्दर्शकाचा मुलगा होता. पण तरीही त्याला टीका सहन करावी लागली. हिरो बनण्यासारखा तुझा चेहरा नाही, असे त्याला सर्रास ऐकवले जाई. पण प्रतिभा आणि आत्मविश्वास या जोरावर धनुषने साऊथ इंडस्ट्रीत स्वत:चे एक वेगळे स्थान निर्माण केले. केवळ इतकेच नाही तर बॉलिवूड मध्येही त्याने आपली प्रतिभा सिद्ध केली.

 

धनुष २००४ साली रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या हिच्या सोबत लग्नगाठीत अडकला. एका सिनेमाच्या स्पेशल स्क्रिनिंग वेळी दोघांची भेट झाली होती. या सिनेमातील धनुषचा अभिनय पाहून ऐश्वर्या कमालीची प्रभावित झाली होती. त्यानंतर तिने त्याला बुके पाठवला आणि हळूहळू दोघांमध्ये मैत्री वाढली. वर्षभरानंतर दोघे लग्नगाठीत अडकले.

 

ऐश्वर्या धनुषपेक्षा दोन वर्षांनी मोठी आहे. 'कोलावरी डी' या प्रचंड लोकप्रिय झालेल्या गाण्याचे बोल स्वत: धनुषने लिहिले होते. असे म्हणतात धनुषने या गाण्याचे बोल केवळ सहा मिनिटांत लिहिले होते.

 

संजीव वेलणकर, पुणे

९४२२३०१७३३

 

संदर्भ : इंटरनेट

 

************

 

************

२८ जुलै - अभिनेत्री हुमा कुरेशी चा वाढदिवस

************

 

जन्म - २८ जुलै १९८६ (दिल्ली)

 

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री हुमा कुरेशीचा आज वाढदिवस.

 

हुमा कुरेशी एका संवेदनशील अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. हुमा कुरेशीने दिल्ली युनिव्हर्सिटीच्या गार्गी कॉलेज मधून इतिहासात बॅचलर डिग्री घेतली आहे. त्याच बरोबर ती दिल्लीच्या थिएटर ग्रुपशी संलग्न होती. हुमा कुरेशीने तिच्या अभिनयाची सुरुवात छोट्या मोठ्या जाहिराती मधून केली. पिअर्स साबण, सॅमसंग आणि नेरोलेकच्या जाहिराती मध्ये ती झळकली होती. जेव्हा ती एका जाहिरातीच्या शूटिंग साठी मुंबईत आली होती, तेव्हा दिग्दर्शक अनुराग कश्यप यांची नजर तिच्यावर पडली. जाहिराती मधील हुमाचे काम बघून अनुराग खूपच प्रभावित झाले. पुढे त्यांनी तिला थेट त्यांच्या चित्रपटात काम करण्याचे निमंत्रण दिले.

 

दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या 'गँग्स ऑफ वासेपुरया चित्रपटातून हुमाने बॉलिवूड मध्ये डेब्यू केला. जेव्हा हुमा इंडस्ट्रीत आली तेव्हा तिच्यावर काहींनी टीकाही केली. परंतु तिने अभिनयाच्या जोरावर टीकाकारांना उत्तर दिले. गँग्स ऑफ वासेपुरमधील तिचा अभिनया एवढा सर्वोत्कृष्ट जमला की, या चित्रपटाचा दुसरा भागही प्रेक्षकांच्या भेटीस आली. दोन्ही भागा मध्ये हुमाने केलेल्या उत्कृष्ट अभिनयामुळे ती चांगलीच चर्चेत आली होती. पुढे तिचे नाव थेट सोहेल खानशी जोडले गेल्याने, तिला ओळखही मिळाली. तिचा भाऊ साकीब सलीम दिग्दर्शक आहे. हुमा कुरेशीने इंडिया बेस्ट ड्रामेबाजया रिअ‍ॅलिटी शोचं परिक्षकपद भूषवले होते.

 

संजीव वेलणकर, पुणे

९४२२३०१७३३

 

संदर्भ : इंटरनेट

 

************

 

************

२८ जुलै - अभिनेत्री अनुराधा राजाध्यक्ष यांचा वाढदिवस

************

 

जन्म - २८ जुलै (नाशिक)

 

जेष्ठ अभिनेत्री अनुराधा राजाध्यक्ष यांचा आज वाढदिवस.

 

अनुराधा राजाध्यक्ष या माहेरच्या कीर्ती मोडक. अनुराधा राजाध्यक्ष यांचे मा रा सारडा कन्या विद्या मंदिर  येथे शालेय शिक्षण व बी वाय के कॉमर्स कॉलेज येथून महाविद्यालय शिक्षण आणि एन बी टी लॉ कॉलेज मधून वकिली चे शिक्षण झाले.

 

'कालचक्र' या नाटकपासून त्यांच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात झाली. सुख पाहता, वरून सगळेच सारखे, प्रियतमा यासारख्या व्यावसायिक नाटकांचा त्या एक भाग बनल्या.  तसेच अनुराधा राजाध्यक्ष यांनी फेअर अँड लव्हली, रिन शक्ती, उजाला, बादाम हेअर ऑइल यासारख्या बऱ्याच जाहिराती त्यांनी साकारल्या आहेत.

 

स्टार प्रवाहवरील 'नकळत सारे घडले' मधील त्यांनी साकारलेली भूमिकाही प्रेक्षकांच्या तितकीच पसंतीस उतरली आहे. वादळवाट, रेशीमगाठी, श्री तशी सौ, विवाहबंधन, १०० डेज यांसारख्या मालिकाही त्यांनी साकारल्या आहेत. 'कुछ खोया कुछ पाया' ही मालिकाही त्यांनी साकारली आहे. यासोबत तुला कळणार नाही, ती सध्या काय करते, फुगे, विठ्ठला शपथ या चित्रपटातही त्यांना अभिनयाची संधी मिळाली.

 

एवढेच नाही तर त्या एक उत्तम कथक विशारद आहेत. त्यासाठी त्यांना सूर सिंगर संसद चा सिंगार मणी पुरस्कार मिळाला आहे, व त्यांच्या अभिनय सामाजिक कार्याच्या कामाबद्दल त्यांना 'तेजस्विनी पुरस्कार' ने देखील सन्मानित करण्यात आले आहे. यासोबतच त्या एक उत्तम लेखिका देखील आहेत.

 

अनेक चित्रपट आणि मालिकेसाठी त्यांनी कथानक लिहिण्याचे काम केले आहे. मालिका, चित्रपट गीते देखील त्यांनी रचली आहेत. त्यापैकी 'रेशीमगाठी' या मालिकेचे शीर्षक गीत त्यांचे आवडते गीत आहे. याशिवाय पेपर मध्ये देखील त्यांनी लेख लिहिण्याचे काम केले आहे. अनुराधा यांचे तिसरे पुस्तक संवाद स्वतःशीप्रकाशित देखील झाले आहे.

 

अनुराधा राजाध्यक्ष यांचा यू ट्यूब चॅनेल असून त्यात त्या अनेक सामाजिक विषयांवर भाष्य करत असतात. 5 Minute Ka Break, इतना तो हम कर ही सकते हैं असे सांगत त्या छोट्या छोट्या गोष्टीं तून समाज हिताचे बदल सुचवतात.

 

अनुराधा राजाध्यक्ष यांच्या पतीचे नाव अभय राजाध्यक्ष होय. अभय राजाध्यक्ष हे युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये कार्यरत होते. याशिवाय ते 'ऍड प्लस पॉईंट' चे डायरेक्टर आहेत. अनुराधा आणि अभय राजाध्यक्ष यांना अभिराज आणि अनुराज नावाची दोन मुले आहेत.

 

संजीव वेलणकर, पुणे

९४२२३०१७३३

 

संदर्भ : इंटरनेट

 

CTIVE AND ADVANCED EDUCATION ALl TYPES:

************

२८ जुलै - मराठी शाहीर पिराजी रामजी सरनाईक जन्मदिन

************

 

जन्म - २८ जुलै

स्मृती - ३० डिसेंबर १९९२

 

शाहीर तिलक, शाहीर विशारद आणि करवीर दरबारचे शाहीर व "लहरी हैदर गुरूजी माझे शीघ्र कवी थोर, त्यांच्या कृपेने शाहीर पिराजी पोवाडा लिहिणार" असे म्हणणाऱ्या पिराजी रामजी सरनाईक या शाहिराने आपल्या खड्या आवाजात अनेक चित्रपटांतून, नाटकांतून, वीररसाने ओथंबलेले पोवाडे म्हटले आणि पिचलेल्या मनगटातही जान आणली, छातीत स्फुरण आणले.

 

कोल्हापुरात शिवाजी पेठेत उभा मारूती चौकातसन १९३३ मध्ये त्यांनी पहिला पोवाडा म्हटला तो बाजीप्रभूंचा. सावकारी पाश' या चित्रपटातील पोवाड्याने त्यांना अमाप प्रसिद्धी मिळाली.

 

मुंबईच्या हिज मास्टर्स व्हाईस (HMV) कंपनीने १९३७ मध्ये मुंबईची कहाणी हे त्यांचे पहिले ग्रामोफोन रेकॉर्डिग केले. पोलीस कचेरीतील कारकुनाची नोकरी सन १९५० मध्ये सोडून देऊन पिराजीरावांनी पूर्ण वेळ शाहिरीला वाहून घेतले.

 

छ.शहाजी महाराजांनी त्यांना शाहीर विशारदहा किताब व तहहयात मानधन दिले. महाराष्ट्र शाहिरी संमेलनाने त्यांना शाहीर तिलकम्हणून गौरवले. म्यानातून तलवार उपसावीअसा शाहिरांचा आवाज बाहेर पडतोअशा शब्दांत शिवभक्त भालजींनी ज्यांना गौरव केला, असे हे शाहीर पिराजीराव. ज्यांच्या शंभरावर पोवाडय़ांच्या रेकॉर्डस प्रसारित झाल्या, असा हा करवीर शाहीर. जुनं ते सोनंहा त्यांच्या गाजलेल्या पोवडय़ांचा संग्रह आहे. 

 

शाहीर पिराजी रामजी सरनाईक यांचे ३० डिसेंबर १९९२ रोजी निधन झाले.

 

संजीव वेलणकर पुणे

९३२२४०१७३३

 

संदर्भ : इंटरनेट

 

************

 

************

२८ जुलै - जागतिक कावीळ दिन

************

 

आज जागतिक कावीळ दिवस !

 

बारुक ब्लूमबर्ग (जन्म - २८ जुलै १९२५) हे अमेरिकन फिजिशियन नि अनुवंशशास्त्रज्ञ होते. १९७६ मध्ये त्यांना संक्रामक आजारांचा तंत्रासंबंधी शोध लावल्याबद्दल नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांनी हेपेटायटीस बी विषाणूची ओळख पटविली आणि नंतर त्याचे निदान चाचणी व लस विकसित केली. कावीळ बाबत जनतेमध्ये जनजागृती व्हावी म्हणून त्यांचा जन्मदिन २८ जुलै हा जागतिक कावीळ दिन म्हणून साजरा करण्यात येतो.

 

आजच्या दिनानिमित्त कावीळ या रोगाबाबत डॉ. श्री बालाजी तांबे यांचा 'फॅमिली डॉक्टर' च्या २८ जुलै २०१७ अंकात प्रसिद्ध झालेला लेख.

 

यकृताला झालेल्या जंतुसंसर्गामुळेही कावीळ होते, तेव्हा त्यास संसर्गजन्य लक्षण समजून काळजी घ्यावी लागते. कावीळ झाली असता हलके हलके डोळे पिवळे होतात, सर्व गोष्टी पिवळ्या दिसायला लागतात, त्वचा पिवळी दिसायला लागते व घामामुळे कपडेही पिवळे होऊ लागतात.

 

कावीळ झालेल्या रुग्णापासून फार सांभाळून राहावे लागते. कारण त्याची लागण एकाकडून दुसऱ्याला लगेच होऊ शकते. कावीळ होण्यास प्रतिबंध होण्यासाठी हात न धुता काही खाऊ नये. वास्तविक नेहमीच, विशेषतः पावसाळ्यात पाणी उकळून, गाळून पिणे इष्ट असते. बऱ्याच वेळी हा रोग साथीसारखा पसरताना दिसतो, अशा वेळी काळजी घेणे खूप आवश्‍यक असते.

 

मनुष्याचा देह जरी पाच तत्त्वांचा बनलेला असला तरी त्यात पृथ्वी आणि जल तत्त्वाचे आधिक्‍य व महत्त्व असते. अन्नात्‌ भवन्ति भूतानिअसे म्हटलेले आहे, अन्न पचून त्याचे शरीर पृथ्वीतत्त्वात रूपांतर व्हावे लागते आणि त्यासाठी पृथ्वीतत्त्वाच्या पिवळ्या रंगाशी साधर्म्य असणारे पित्त उपयोगी पडते. सप्तरंगापैकी सर्वांत मधला रंग असतो हिरवा. हिरव्याच्या खाली पृथ्वी असायलाच पाहिजे आणि तिचा रंग असतो पिवळा. खोल खणल्यावर मिळतो पृथ्वीच्या पोटातील धगधगीत नारंगी रंगाचा अग्नी. हिरव्याच्या वर मिळतो निळा आणि तोच नंतर पारवा होऊन जांभळ्या पर्यंत पोचतो. असे हे शक्‍तीचे चक्र अनेक आवर्तने घेत पुरे होते.

 

शरीरात पचन करणारे, दृष्टीला ताकद देणारे, सर्व जीवनाची उमेद वाढविणारे असते पिवळे पित्त व त्यात असलेला अग्नी. जठराग्नी जसा पित्ताच्या मदतीने पचनाला मदत करतो, तसे पित्तातील सूक्ष्मत्व दृष्टीला प्रकाश व ज्ञान देते. पित्ताचे मुख्य स्थान यकृत. अन्न सेवन केल्यानंतर पित्त संतुलित असेल तरच अन्न गिळता येते. अन्न गिळण्यापूर्वीच त्यात पित्ताचे काही पाचक रस मिसळले जातात.

 

अन्न पुढे आतड्यात जाण्यापूर्वी यकृताच्या पाचक पित्तामुळे संस्कारित होते. पित्त जरासे जरी कमी झाले तरी तोंडात घास घोळायला लागतो वा पित्त वाढल्यास उलटीसारखे वाटायला लागते. अशा त्रासावर उपाय करणे तुलनेत सोपे असते. पण यकृताचे कार्य मंदावण्यामुळे वा जलद होण्यामुळे, यकृतात भोके पडल्यामुळे त्रास उत्पन्न झाला तर अन्न पचेनासे होऊन हातापायाच्या काड्या होतात. 

 

यकृताला झालेल्या जंतुसंसर्गामुळेही कावीळ होते, तेव्हा त्यास संसर्गजन्य लक्षण समजून काळजी घ्यावी लागते. कावीळ झाली असता हलके हलके डोळे पिवळे होतात, सर्व गोष्टी पिवळ्या दिसायला लागतात, त्वचा पिवळी दिसायला लागते व घामामुळे कपडेही पिवळे होऊ लागतात. 

 

अस्वच्छ पाणी प्यायल्याने जंतुसंसर्ग होऊन काविळीला तोंड द्यावे लागते. आधुनिक वैद्यकाप्रमाणे काविळीचे पाच-सहा प्रकार वर्णन केलेले दिसतात. कावीळ झालेल्या रुग्णापासून फार सांभाळून राहावे लागते. कारण त्याची लागण एकाकडून दुसऱ्याला लगेच होऊ शकते. कावीळ झालेल्या व्यक्‍तीचे रक्‍त प्रयोगशाळेत तपासणीसाठी आले असता तपासणाऱ्याला कावीळ होऊन मृत्यू ओढविल्याच्या घटनाही ऐकिवात आहेत. 

 

चष्मा लावावा तसे जग दिसते असे म्हणतात. कावीळ झाली असता सर्व पिवळे दिसायला लागते. हा पीलिया रोगज्या घरात झालेला असतो त्या घरातल्यांचे मात्र डोळे पांढरे व्हायची वेळ आलेली असते.  

 

कावीळ बरी करण्याचा प्रयत्न केला तरी ती पुन्हा उलटू शकते. पथ्य व विश्रांतीच्या बाबतीत नीट काळजी घेतली नाही तर हा रोग उलटतो. या रोगाचे अनेक प्रकार असतात. प्रकारानुसार वेगवेगळ्या पद्धतीने इलाज करावे लागतात व औषधयोजनाही व्यवस्थित करावी लागते. कावीळ बरी झाल्यानंतर काही महिन्यांपर्यंत कावीळ उलटणार नाही, याकडे लक्ष द्यावे लागते. 

 

काविळीवरचा अत्यंत साधा व सोपा इलाज म्हणजे कपभर निरशा गाईच्या दुधात पाच-सहा एरंडाच्या ताज्या पानांचा रस मिसळून सकाळी सूर्योदयापूर्वी तीन-चार दिवस घेणे, यामुळे काविळीला उतार पडतो. ही औषधयोजना चालू असताना दूध-भातासारखा साधा आहार ठेवावा. याने खूप जणांना बरे वाटते असा अनुभव असला तरी काविळीचा प्रादुर्भाव झाला तर आधुनिक वैद्यकानुसारही तपासणी अवश्‍य करून घ्यावी. अशा तऱ्हेचा घरगुती उपचार करत असताना डॉक्‍टरांनी रोग्यावर नीट लक्ष ठेवून अपेक्षित परिणाम न दिसल्यास इतर उपचार करावे

 

त. इतर उपचार करत असतानाही पथ्य व विश्रांती महत्त्वाची असतेच. 

 

एकूणच यकृताच्या आरोग्यासाठी बेलाचा मुुरांबा वा काढा किंवा सॅन उदर सारखे आसव घेणे खूप महत्त्वाचे असते. या गोष्टी घेण्याने यकृताची ताकद वाढून काविळी सारखे रोग होत नाहीत. एकूणच यकृताचा अग्नी मंद (डल लिव्हर) होऊ नये किंवा यकृताला जाड्य (फॅटी लिव्हर) येऊ नये म्हणून किंवा पित्ताचा त्रास होणाऱ्यांनी, भूक न लागणाऱ्यांनी अधूनमधून सॅन उदर आसव, पुनर्सन आसव घेण्याने काविळीला प्रतिबंध करता येऊ शकतो.

 

कावीळ होण्यास प्रतिबंध होण्यासाठी हात न धुता काही खाऊ नये. वास्तविक नेहमीच, विशेषतः पावसाळ्यात पाणी उकळून, गाळून पिणे इष्ट असते. बऱ्याच वेळी हा रोग साथीसारखा पसरताना दिसतो, अशा वेळी काळजी घेणे खूप आवश्‍यक असते.

 

एकूणच सातत्याने रात्रीची जागरणे, तेलकट तुपकट पदार्थांचे सेवन अति प्रमाणात करणे, अपचन झाले असतानाही खात राहणे असे वागत राहिल्यास काविळीच्या रोगाला आमंत्रण देण्यासारखे असते. बऱ्याच वेळी मांसाहारासारखे जडान्न सवय नसतानाही खात राहण्याने काविळीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. बाळ गर्भात असताना आईने चुकीचा आहार घेण्याने किंवा दूषित पाणी पिण्याने बाळाला जन्मतः किंवा जन्मानंतर काविळीचा त्रास होऊ शकतो.  

 

मनुष्याचे कर्तृत्व व पुरुषार्थ ज्या पित्तावर अवलंबून असतो त्या पित्ताशी खेळणे फारसे चांगले नसते, म्हणून कावीळ होऊ नये इकडे लक्ष देण्याबरोबरच कावीळ झालीच तर ताबडतोब उपाययोजना करणे आवश्‍यक असते.  

 

संकलन : मिलिंद पंडित, कल्याण

 

संदर्भ : सकाळ/इंटरनेट

 

************

 

************

२८ जुलै - जागतिक निसर्ग संवर्धन दिन

************

 

आज जागतिक निसर्ग संवर्धन दिन !

 

निसर्गातील अनेक घटकांचा वापर आपण आपल्या फायद्यासाठी करतो. परंतु, गरजेपलीकडे जाऊन असे घटक ओरबाडले जाऊ लागल्याने संपूर्ण सृष्टीचक्रातच अडथळे येऊ लागले आहेत. योग्य, शाश्वत आणि नियंत्रित वापराबद्दल सर्वत्र जनजागृती करण्यासाठी हा नेचर कॉन्झर्वेशन डेजगभर पाळला जातो.

 

मूळ संकल्पना व सुरुवात

 

विकास (डेव्हलपमेंट) म्हणजे आपले उद्दिष्ट साधण्याच्या आड येणारे सर्व काही नष्ट करायचे अशी चुकीची संकल्पना. आधुनिक व सुखासीन जीवनशैली रुजू लागल्याने पृथ्वीवरील नैसर्गिक समतोल बिघडला. त्याचे परिणाम लवकरच दिसू लागल्याने निसर्ग संरक्षणाची आणि संवर्धनाची जाणीव सर्वांच्या मनात ठसविणे गरजेचे बनले. वस्तू आणि संसाधनांचा पुनर्वापर केल्यानेही खूप चांगला फरक पडतो असेही दिसून आले आहे.

 

अधिक माहिती*

 

सध्या आपण वापरत असलेली नैसर्गिक साधनसंपत्ती तयार होण्यास हजारो वर्ष लागतात. परंतु आपण ती संपविण्याचाच निश्चय केल्या सारखी स्थिती आहे. यामुळे वने, वन्यजीव, वनांतून मिळणारे पदार्थ, खनिजे आणि खनिज इंधने सर्वच मौल्यवान स्रोतांवर असह्य ताण आला आहे व त्याचे परिणाम थोड्याच वर्षात वापरकर्त्याला म्हणजे आपल्यालाच भोगावे लागणार आहेत.

 

जीवनशैलवर नियंत्रण ठेवणे आणि वस्तूंचा पुनर्वापर (३ आर म्हणजे रिड्यूस, रीयुज, रिसायकल) हा उपाय सर्व पातळ्यांवर केल्यासच आशेचा किरण आहे. प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखली तरच हा दिवस सार्थकी ठरू शकतो.

 

 

 संकलन : मिलिंद पंडित, कल्याण

 

संदर्भ : विकासपीडिया

 

२८ जुलै

जागतिक कावीळ दिन

 

बारुक ब्लुमबर्ग

कावीळ संशोधन

जन्मदिन - २८ जुलै १९२५

 

बारुक ब्लूमबर्ग (जन्म - २८ जुलै १९२५) हे अमेरिकन फिजिशियन नि अनुवंशशास्त्रज्ञ होते. १९७६ मध्ये त्यांना संक्रामक आजारांचा तंत्रासंबंधी शोध लावल्याबद्दल नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांनी हेपेटायटीस बी विषाणूची ओळख पटविली आणि नंतर त्याचे निदान चाचणी व लस विकसित केली. कावीळ बाबत जनतेमध्ये जनजागृती व्हावी म्हणून त्यांचा जन्मदिन २८ जुलै हा जागतिक कावीळ दिन म्हणून साजरा करण्यात येतो.

 

आजच्या दिनानिमित्त कावीळ या रोगाबाबत डॉ. श्री बालाजी तांबे यांचा 'फॅमिली डॉक्टर' च्या २८ जुलै २०१७ अंकात प्रसिद्ध झालेला लेख.

 

यकृताला झालेल्या जंतुसंसर्गामुळेही कावीळ होते, तेव्हा त्यास संसर्गजन्य लक्षण समजून काळजी घ्यावी लागते. कावीळ झाली असता हलके हलके डोळे पिवळे होतात, सर्व गोष्टी पिवळ्या दिसायला लागतात, त्वचा पिवळी दिसायला लागते व घामामुळे कपडेही पिवळे होऊ लागतात.

 

कावीळ झालेल्या रुग्णापासून फार सांभाळून राहावे लागते. कारण त्याची लागण एकाकडून दुसऱ्याला लगेच होऊ शकते. कावीळ होण्यास प्रतिबंध होण्यासाठी हात न धुता काही खाऊ नये. वास्तविक नेहमीच, विशेषतः पावसाळ्यात पाणी उकळून, गाळून पिणे इष्ट असते. बऱ्याच वेळी हा रोग साथीसारखा पसरताना दिसतो, अशा वेळी काळजी घेणे खूप आवश्‍यक असते.

 

मनुष्याचा देह जरी पाच तत्त्वांचा बनलेला असला तरी त्यात पृथ्वी आणि जल तत्त्वाचे आधिक्‍य व महत्त्व असते. अन्नात्‌ भवन्ति भूतानिअसे म्हटलेले आहे, अन्न पचून त्याचे शरीर पृथ्वीतत्त्वात रूपांतर व्हावे लागते आणि त्यासाठी पृथ्वीतत्त्वाच्या पिवळ्या रंगाशी साधर्म्य असणारे पित्त उपयोगी पडते. सप्तरंगापैकी सर्वांत मधला रंग असतो हिरवा. हिरव्याच्या खाली पृथ्वी असायलाच पाहिजे आणि तिचा रंग असतो पिवळा. खोल खणल्यावर मिळतो पृथ्वीच्या पोटातील धगधगीत नारंगी रंगाचा अग्नी. हिरव्याच्या वर मिळतो निळा आणि तोच नंतर पारवा होऊन जांभळ्या पर्यंत पोचतो. असे हे शक्‍तीचे चक्र अनेक आवर्तने घेत पुरे होते.

 

शरीरात पचन करणारे, दृष्टीला ताकद देणारे, सर्व जीवनाची उमेद वाढविणारे असते पिवळे पित्त व त्यात असलेला अग्नी. जठराग्नी जसा पित्ताच्या मदतीने पचनाला मदत करतो, तसे पित्तातील सूक्ष्मत्व दृष्टीला प्रकाश व ज्ञान देते. पित्ताचे मुख्य स्थान यकृत. अन्न सेवन केल्यानंतर पित्त संतुलित असेल तरच अन्न गिळता येते. अन्न गिळण्यापूर्वीच त्यात पित्ताचे काही पाचक रस मिसळले जातात.

 

अन्न पुढे आतड्यात जाण्यापूर्वी यकृताच्या पाचक पित्तामुळे संस्कारित होते. पित्त जरासे जरी कमी झाले तरी तोंडात घास घोळायला लागतो वा पित्त वाढल्यास उलटीसारखे वाटायला लागते. अशा त्रासावर उपाय करणे तुलनेत सोपे असते. पण यकृताचे कार्य मंदावण्यामुळे वा जलद होण्यामुळे, यकृतात भोके पडल्यामुळे त्रास उत्पन्न झाला तर अन्न पचेनासे होऊन हातापायाच्या काड्या होतात. 

 

यकृताला झालेल्या जंतुसंसर्गामुळेही कावीळ होते, तेव्हा त्यास संसर्गजन्य लक्षण समजून काळजी घ्यावी लागते. कावीळ झाली असता हलके हलके डोळे पिवळे होतात, सर्व गोष्टी पिवळ्या दिसायला लागतात, त्वचा पिवळी दिसायला लागते व घामामुळे कपडेही पिवळे होऊ लागतात. 

 

अस्वच्छ पाणी प्यायल्याने जंतुसंसर्ग होऊन काविळीला तोंड द्यावे लागते. आधुनिक वैद्यकाप्रमाणे काविळीचे पाच-सहा प्रकार वर्णन केलेले दिसतात. कावीळ झालेल्या रुग्णापासून फार सांभाळून राहावे लागते. कारण त्याची लागण एकाकडून दुसऱ्याला लगेच होऊ शकते. कावीळ झालेल्या व्यक्‍तीचे रक्‍त प्रयोगशाळेत तपासणीसाठी आले असता तपासणाऱ्याला कावीळ होऊन मृत्यू ओढविल्याच्या घटनाही ऐकिवात आहेत. 

 

चष्मा लावावा तसे जग दिसते असे म्हणतात. कावीळ झाली असता सर्व पिवळे दिसायला लागते. हा पीलिया रोगज्या घरात झालेला असतो त्या घरातल्यांचे मात्र डोळे पांढरे व्हायची वेळ आलेली असते.  

 

कावीळ बरी करण्याचा प्रयत्न केला तरी ती पुन्हा उलटू शकते. पथ्य व विश्रांतीच्या बाबतीत नीट काळजी घेतली नाही तर हा रोग उलटतो. या रोगाचे अनेक प्रकार असतात. प्रकारानुसार वेगवेगळ्या पद्धतीने इलाज करावे लागतात व औषधयोजनाही व्यवस्थित करावी लागते. कावीळ बरी झाल्यानंतर काही महिन्यांपर्यंत कावीळ उलटणार नाही, याकडे लक्ष द्यावे लागते. 

 

काविळीवरचा अत्यंत साधा व सोपा इलाज म्हणजे कपभर निरशा गाईच्या दुधात पाच-सहा एरंडाच्या ताज्या पानांचा रस मिसळून सकाळी सूर्योदयापूर्वी तीन-चार दिवस घेणे, यामुळे काविळीला उतार पडतो. ही औषधयोजना चालू असताना दूध-भातासारखा साधा आहार ठेवावा. याने खूप जणांना बरे वाटते असा अनुभव असला तरी काविळीचा प्रादुर्भाव झाला तर आधुनिक वैद्यकानुसारही तपासणी अवश्‍य करून घ्यावी. अशा तऱ्हेचा घरगुती उपचार करत असताना डॉक्‍टरांनी रोग्यावर नीट लक्ष ठेवून अपेक्षित परिणाम न दिसल्यास इतर उपचार करावेत. इतर उपचार करत असतानाही पथ्य व विश्रांती महत्त्वाची असतेच. 

 

एकूणच यकृताच्या आरोग्यासाठी बेलाचा मुुरांबा वा काढा किंवा सॅन उदर सारखे आसव घेणे खूप महत्त्वाचे असते. या गोष्टी घेण्याने यकृताची ताकद वाढून काविळी सारखे रोग होत नाहीत. एकूणच यकृताचा अग्नी मंद (डल लिव्हर) होऊ नये किंवा यकृताला जाड्य (फॅटी लिव्हर) येऊ नये म्हणून किंवा पित्ताचा त्रास होणाऱ्यांनी, भूक न लागणाऱ्यांनी अधूनमधून सॅन उदर आसव, पुनर्सन आसव घेण्याने काविळीला प्रतिबंध करता येऊ शकतो.

 

कावीळ होण्यास प्रतिबंध होण्यासाठी हात न धुता काही खाऊ नये. वास्तविक नेहमीच, विशेषतः पावसाळ्यात पाणी उकळून, गाळून पिणे इष्ट असते. बऱ्याच वेळी हा रोग साथीसारखा पसरताना दिसतो, अशा वेळी काळजी घेणे खूप आवश्‍यक असते.

 

एकूणच सातत्याने रात्रीची जागरणे, तेलकट तुपकट पदार्थांचे सेवन अति प्रमाणात करणे, अपचन झाले असतानाही खात राहणे असे वागत राहिल्यास काविळीच्या रोगाला आमंत्रण देण्यासारखे असते. बऱ्याच वेळी मांसाहारासारखे जडान्न सवय नसतानाही खात राहण्याने काविळीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. बाळ गर्भात असताना आईने चुकीचा आहार घेण्याने किंवा दूषित पाणी पिण्याने बाळाला जन्मतः किंवा जन्मानंतर काविळीचा त्रास होऊ शकतो.  

 

मनुष्याचे कर्तृत्व व पुरुषार्थ ज्या पित्तावर अवलंबून असतो त्या पित्ताशी खेळणे फारसे चांगले नसते, म्हणून कावीळ होऊ नये इकडे लक्ष देण्याबरोबरच कावीळ झालीच तर ताबडतोब उपाययोजना करणे आवश्‍यक असते.  

साहित्य उत्सववर वाचूया आजचे दिनविशेष

 

२८ जुलै - दिनविशेष

 

२८ जुलै रोजी झालेल्या घटना वाचूया साहित्य उत्सववर

 

१८२१: पेरू देशाला स्पेनपासून स्वातंत्र्य मिळाले.

 

१९३३: सोव्हिएत युनियन आणि स्पेनमधे राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले.

 

१९३३: अँडोराचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.

 

१९३४: पं. मदनमोहन मालवीय आणि बापूजी अणे यांनी काँग्रेस राष्ट्रीय पक्षाची स्थापना केली.

 

१९४३: दुसरे महायुद्ध रॉयल एअर फोर्सने जर्मनीतील हॅम्बुर्ग शहरावर केलेल्या तुफानी बॉम्बहल्ल्यात ४२,००० नागरिक ठार झाले.

 

१९७६: चीनच्या तांग्शान प्रांतात रिश्टर ७.८ ते ८.२ तीव्रतेचा भूकंप. २,४२,७६९ ठार तर १,६४,८५१ जखमी झाले.

 

१९७९: भारताच्या ५व्या पंतप्रधानपदी चौधरी चरणसिंग यांची नियुक्ती.

 

१९८४: लॉस एंजिलिस येथे २३व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.

 

१९९८: सर्वोच्च आणि उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींच्या नियुक्त्या आणि बदल्यांबाबत नऊ न्यायमूर्तींचा समावेश असलेले स्वतंत्र घटनापीठ स्थापन.

 

१९९९: भारतीय धवल क्रांतीचे शिल्पकार डॉ. वर्गीस कुरियन यांना पालोस मार ग्रेगोरिओस पुरस्कार प्रदान.

 

२००१: आसामी लेखिका इंदिरा गोस्वामी यांना ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान.

 

 

२८ जुलै रोजी झालेले जन्म वाचूया साहित्य उत्सववर

 

१९०७: टपर वेअरचे संशोधक अर्ल टपर यांचा जन्म. (मृत्यू: ५ ऑक्टोबर १९८३)

 

१९२५: हेपटायटीस बी रोगजंतू चे शोधक बारूच सॅम्युअल ब्लमबर्ग यांचा जन्म. (मृत्यू: ५ एप्रिल २०११)

 

१९२९: जॉन एफ. केनेडी यांची पत्नी जॅकलिन केनेडी यांचा जन्म.

 

१९३६: वेस्ट इंडीजचे क्रिकेट कर्णधार आणि फलंदाज सरगॅरी सोबर्स यांचा जन्म.

 

१९४५: अमेरिकन व्यंगचित्रकार जिम डेव्हिस यांचा जन्म.

 

१९५४: व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष ह्युगो चावेझ यांचा जन्म. (मृत्यू: ५ मार्च २०१३)

 

१९७०: झिम्बाब्वेचे क्रिकेट खेळाडू पॉल स्ट्रँग यांचा जन्म.

 

२८ जुलै रोजी झालेले मृत्यू वाचूया साहित्य उत्सववर

 

४५०: पवित्र रोमन सम्राट थियोडॉसियस दुसरा यांचे निधन. (जन्म: १० एप्रिल ४०१)

 

१७९४: फ्रेंच क्रांतिकारी मॅक्सिमिलियें रॉबिस्पियरे यांचे निधन.

 

१८४४: नेपोलियनचा फ्रेंच भाऊ जोसेफ बोनापार्ते यांचे निधन. (जन्म: ७ जानेवारी १७६८)

 

१९३४: दक्षिण आफ्रिकेचे क्रिकेट खेळाडू लुइस टँक्रेड यांचे निधन.

 

१९६८: नोबेल पारितोषिक विजेते जर्मन रसायनशास्त्रज्ञ ऑटो हान यांचे निधन. (जन्म: ८ मार्च १८७९)

 

१९७५: चित्रपट दिग्दर्शक राजाराम दत्तात्रय तथा राजा ठाकूर यांचे निधन. (जन्म: २६ नोव्हेंबर १९२३ फोंडा, गोवा)

 

१९७७: गायक आणि अभिनेते पंडित राव नगरकर यांचे निधन.

 

१९८१: नाटककार बाबूराव गोखले यांचे निधन. (जन्म: १९ सप्टेंबर १९२५)

 

१९८८: राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत सलग ८ वेळा विजेतेपद मिळवणारे सैद मोदी यांची लखनऊत हत्या.

 

२०२०: भारतीय तेलगू अभिनेते, निर्माता आणि दिग्दर्शकरवी कोंडाला राव यांचे निधन. (जन्म: ११ फेब्रुवारी १९३२)

आज २८ जुलै

आज ज्येष्ठ रंगकर्मी #ललिता_केंकरे यांचा स्मृतिदिन.

जन्म.२ ऑक्टोबर १९३७

ललिता केंकरे या नाट्यदिग्दर्शक दामू केंकरे यांच्या पत्नी व प्रसिद्ध दिग्दर्शक विजय केंकरे यांच्या मातोश्री होत.ललिता केंकरे यांना नाट्य व कलेचा वारसा माहेर हून मिळाला, व पुढे विवाहानंतरचा प्रवास दामू केंकरे यांच्यासारख्या चतुरस्र नाट्यकर्मी सोबत झाला. ललिता केंकरे या माहेरच्या ललिता आमोणकर. मुंबई साहित्य संघाच्या नाट्यशाखेचे एक आधारस्तंभ तात्या आमोणकर हे ललिताबाईंचे वडील; त्यामुळे ललिता आणि सुधा (करमरकर) या भगिनी अल्लड वयातच रंगभूमीवर बेलाशक बागडल्या असतील, तर नवल नाही. तात्यांना आपल्या लेकींना यथोचित, शास्त्रशुद्ध कलाशिक्षण द्यावयाचे होते. म्हणूनच ललिता या गायन, नाट्य आणि नृत्य या तिन्ही कलांचे औपचारिक शिक्षण घेण्यासाठी वडिलांचे बोट धरून दिग्गज कलावंतांच्या गुरूकुलांमध्ये गेल्या.या गुरुवर्यांमध्ये कला अकादमी चालविणारे पार्श्वनाथ आळतेकर होते, तसे नर्तनगुरू पार्वतीकुमारही होते. गायनगुरू पंडित गोविंदराव अग्नीही होते. पुढे ललिताबाईंनी संगीत नाटक, गद्य नाटके, लोकनाट्ये, मराठी किंवा हिंदी चित्रपट, मालिका या सर्वच प्रकारांमध्ये ज्या सहजतेने आणि काळाशी सुसंगत अशा अभिनय शैलीने कामे केली, त्या साऱ्यांचे मूळ या चौफेर प्रशिक्षणात होते. दामू केंकरे यांच्या पत्नी किंवा अभिनेते विजय यांच्या आई इतकीच त्यांची ओळख नव्हती. साहित्य संघ, सुधा करमरकर, दामू केंकरे यांच्या निर्मितीत त्या सहजतेने सहभागी होत. ते घरचेच कार्य असे; पण सई परांजपे यांचा 'कथा' चित्रपट असो किंवा श्याम बेनेगेल यांची 'यात्रा' ही मालिका असो, ललिताबाईंनी त्यात अभिनयाचा ठसा उमटविला. 'संगीत सौभद्र', 'तुझे आहे तुजपाशी', 'पती गेले गं काठेवाडी' ही नाटकांची नावे त्यांचे अष्टपैलूत्व सांगण्यास पुरेशी आहेत.

ललिता केंकरे यांचे २८ जुलै २०२० रोजी निधन झाले.*

संकलन.#संजीव_वेलणकर पुणे.

९४२२३०१७३३

संदर्भ.इंटरनेट

ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.

आज २८ जुलै

आज टीव्हीवरील प्रसिद्ध अभिनेत्री #चाहत_खन्ना चा वाढदिवस.

 जन्म.२८ जुलै १९८६

 बडे अच्छे लगते है या मालिकेतून घराघरात पोहोचलेली चाहत खन्ना छोट्या पडद्यावरील एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.कबूल है 'कुमकुम: प्यारा सा बंधन', 'तुझ संग प्रीत लगाई सजना' आणि 'हीरो भक्ति की शक्ति है' यांसारख्या मालिकेत झळकली होती.

तसेच ती संजय दत्तच्या प्रस्थानम सिनेमात झळकली होती. चाहतनं २०१३ साली फरहान मिर्झासोबत लग्न केलं. लग्नानंतर तिला लगेचच मुलं झाली. त्यामुळं मुंलांचा सांभाळ करण्यासाठी तिनं मालिकेतून ब्रेक घेतला होता. या दरम्यान ती आपल्या पतीसोबत त्यांच्या फॅमेली बिझनेस सांभाळत होती.परंतु २०१८ मध्ये तिचा घटस्फोट झाला. तेव्हापासून ती आपल्या दोन मुलांसोबत एकटी रहात आहे.

#संजीव_वेलणकर पुणे.

९४२२३०१७३३

संदर्भ.इंटरनेट

ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.

आज २८ जुलै

आज ज्येष्ठ नाटय निर्मात्या #लता_नार्वेकर यांचा वाढदिवस.

जन्म.२८ जुलै १९४०

एखादी गोष्ट करायची ठरवल्यावर माणूस ती किती निर्धाराने आणि यशस्वीपणे पार पाडू शकतो, याचं उत्तम उदाहरण म्हणजे प्रथितयश नाटयनिर्मात्या आणि आता सिनेनिर्मात्या लता नार्वेकर.

एकापेक्षा एक वैविध्यपूर्ण विषय लता नार्वेकरांनी आपल्या नाटकांतून दिले आहेत.

पाचवीत असताना त्यांचे वडील वारले, त्यामुळे घरची जबाबदारी त्यांच्यावर आली. अगदी कठीण परिस्थितीतूनही मार्ग काढणारा आणि मनाला पटेल, रुचेल तेच करणारा त्यांचा स्वभाव आपल्याला त्यांच्या प्रत्येक शब्दामधून जाणवतो. संघर्ष हाच त्यांच्या जीवनाचा स्थायीभाव आहे असं म्हटलं तरी ते चुकीचं ठरणार नाही. म्हणूनच तर रुळलेल्या वाटा सोडून त्या. लता नार्वेकर जेव्हा नाटयनिर्मितीच्या क्षेत्रात उतरल्या तेव्हा नाटयनिर्मितीच्या क्षेत्रात कोणतीही स्त्री नव्हती. प्रयोगांच्या तारखा लावणं; त्यासाठीची धावपळ; वेळी-अवेळी प्रवास; लोकांच्या गाठीभेटी; नाटकातील कलाकार, पडद्यामागचे तंत्रज्ञ, दिग्दर्शक अशी एकत्र मोट बांधणं खूप जिकरीचं असतं. त्यामुळे शक्यतो नाटयनिर्मितीकडे स्त्रिया करीअर म्हणून बघत नसाव्यात अशी शक्यता आहे.

नाट्य निर्मिती क्षेत्रात उतरण्या आधी लता नार्वेकर या शिक्षिका म्हणून काम करत असत. शिकवत असतानाही त्या त उतरल्या. चिकित्सक समूह, राममोहन, प्रभु सेमिनरी अशा तीन शाळांमधून शिक्षिकेची नोकरी केली. शाळेत त्या गणित आणि मराठी विषय शिकवायच्या. मराठी हा लता नार्वेकर यांचा आवडता आणि प्रभुत्वाचा विषय, सोबत नाटकांचीही आवड. नाट्य निर्मिती करत असताना पण त्यांनी २५ वर्षे शाळेची नोकरी करून १९९४ मध्ये व्हिआरएसची स्कीम आल्यावर लगेचच व्हिआरएस घेतली. काही काळ श्रीसाप्ताहिकासाठी स्नेहांकिता नावाने नाटयसमीक्षाही लता नार्वेकर यांनी लिहिल्या आहेत. या दरम्यान लता नार्वेकरांना वसंत कानेटकर, सुरेश खरे, शं. ना. नवरे, वि. वा. शिरवाडकर अशा दिग्गजांची नाटकं बघण्याची संधी मिळाली. त्यातूनच नाटकांविषयीची आवड वाढीस लागली आणि नाटयनिर्मितीचा ध्यास लता नार्वेकर यांना लागला. सुरुवातीला काही नाटकांची पुन्हा निर्मिती केली. पण ओळख नसल्याने त्या एका मुलाखतीत म्हणतात मला निर्माती व्हायचं होतं, पण निर्माती म्हणून तेव्हा मला कोणी ओळखत नव्हतं. मला निर्माती म्हणून चेहरा नव्हता. अशावेळी कोण मला अगदी पहिल्या खेपेची नाटकं देणार, त्यामुळे काही नाटकं मी दुस-यांदा स्टेजवर आणली. १९८७-८८ मध्ये कमलाकर सारंग दिग्दर्शित श्रध्दापुन्हा स्टेजवर आणलं. मी नाटकांची निवड करताना प्रेक्षकांच्या भूमिकेत शिरते. प्रेक्षकांना काय आवडेल, एखाद्या विषयाला ते कसा response देतील अशा दृष्टीकोनातून नाटकाची निवड करते. नाटकाला साहित्यिक मूल्यं असलीच पाहिजेत, यावर त्या ठाम असतात’. ‘नाटकाच्या जातकुळीनुसार कलाकार, दिग्दर्शक, यांची निवड मी करते. मी खूप choosy आहे. एखाद्या विशिष्ट विषयाला अमुक एक दिग्दर्शक हवाच, असं जर मला वाटलं तर तोच दिग्दर्शक निवडते. याबाबतीत तडजोड नाही. हा दिग्दर्शक घ्या, अमुक एक कलाकार घ्या असं जर मला कोणी म्हणालं, तर मी ते ऐकून घेणार नाही. लता नार्वेकर यांच्या कामाची दखल घेण्यासाठी तू फक्त हो म्हणआणि चारचौघीही नाटकं कारणीभूत ठरली.

"श्री चिंतामणी" ही लता नार्वेकर यांची  नाटय़निर्माती संस्था होय. या संस्थेने नेहमी सकस सामाजिक विषयाची नाटक़ं निवडली. श्री चिंतामणीची नाटकं समाजातल्या त्या त्या वेळेला भेडसावणाऱया प्रश्नांवर बेतलेली असायची आणि म्हणूनच श्री चिंतामणीची नाटकं प्रेक्षकांना भावली आणि तुफान चालली. मराठी नाटय़रसिकांच्या पसंतीची पावती श्री चिंतामणीच्या प्रत्येक प्रयोगाच्या प्रत्येक तिकिटनिशी फाटायची. लता नार्वेकर या स्वतः भविष्य विश्वास ठेवणाऱ्या असून त्यांनी ज्याचा त्याचा प्रश्नसारखं देव मानावा की नाही या विषयावरचं नाटक केलं. चाहुलया नाटकावर प्रतिक्रिया म्हणून लिहिलेलं कळा या लागल्या जीवाहेदेखील सादर केलं. मैलाचा दगड म्हणून ओळखली जाणारी ही दोन्ही नाटकं श्री चिंतामणीने रंगभूमीवर आणली. नाटय़व्यवसायाची सामाजिक बांधीलकी लताबाईंनी नेहमीच जपली. त्यांनी नाटक कसं आहे हे पाहून निर्मिती केली.  लताबाईंनी नाटक आणि नाटकाचा विषय पाहून ही दोन्ही नाटकं करायचं ठरवलं. या सगळ्याला अपवाद म्हणजे श्री चिंतामणीचं आजवरचं सर्वात यशस्वी नाटक सही रे सही’. निखळ मनोरंजन करणारं हे नाटक श्री चिंतामणीला बहाल झालं. सही रे सहीया नाटकाने तर प्रयोगांचे उच्चांक प्रस्थापित केले. तसेच सही रे सही या नाटकाने वाद निर्माण केले होते. लता नार्वेकर यांचा आणखी एक गुण म्हणजे त्या कधीच नाटय़निर्मितीच्या स्पर्धेत नव्हत्या. प्रत्येक नाटय़हंगामात आपलं नाटक आलंच पाहिजे हा अट्टाहास नव्हता. श्री चिंतामणी आपल्या वेळेनुसार नाटक करायचं आणि ठोक बजावून करायचं.  प्रशांत दळवी, अभिराम भडकमकर आणि किरण पोत्रेकर सारख्या उत्तम नाटककारांना व्यावसायिक जगात पहिली संधी लता नार्वेकर यांनी दिली. नाटयनिर्मिती नंतर लता नार्वेकर यांनी सिनेमा निर्मिती केली होती. सरीवर सरीहा त्यांचा पहिला चित्रपट होता.

सध्या "श्री चिंतामणी" या लता नार्वेकर यांच्या संस्थेने एक विलक्षण वेगळं आणि खूपचं इंटरेस्टिंग नाटक रंगभूमीवर आणलंय तरुण आहे रात्र अजूनी’.‘तरुण आहे रात्र अजूनीहे नाटक आजच्या समाजाच्या जीवनशैलीवर भाष्य करणारं कथानक घेऊन उभं राहतं. कॉर्पोरेट विश्वात आपला संपूर्ण वेळ आणि ऊर्जा विकून जगणाऱया आजच्या समाजात, नाती आणि संबंधांच्या व्याख्याच पार बदलून गेल्या आहेत. या बदलणाऱ्या व्याख्यांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न तरुण आहे रात्र अजूनीया नाटकातून केला गेलेला आहे. यातील कलाकार आहेत सुलेखा तळवलकर, संदीप मेहता व आस्ताद काळे. लॉकडाऊन मुळे याचे प्रयोग थांबलेले आहेत. लता नार्वेकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.

संकलन.#संजीव_वेलणकर पुणे.

९४२२३०१७३३

संदर्भ.इंटरनेट

ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.

आज २८ जुलै

आज अभिनेता #धनुष चा वाढदिवस.

जन्म. २८ जुलै १९८३

धनुष हा कोलावरी डीया गाण्याने प्रसिद्धीझोतात आला. धनुष हा सुपरस्टार रजनीकांत यांचा जावई आहे. धनुषचे खरे नाव वेंकटेश प्रभू कस्तुरी राजा आहे. साऊथ सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध दिग्दर्शक कस्तुरी राजा यांचा तो मुलगा आहे. वयाच्या १६ व्या वर्षी धनुषने  वडिलांच्या  थुल्लुवाधो इलामाईया सिनेमाद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. पुढे रांझणाआणि षमिताभया बॉलिवूड चित्रपटांतही तो झळकला. खरे तर धनुषला अभिनयात अजिबात रस नव्हता. धनुषचे वडील कस्तूरी राजा मोठे दिग्दर्शक होते. त्यामुळे त्यांच्या घरात सतत साऊथच्या दिग्गज अभिनेत्यांनी ये-जा असे. पण कुठलाही अॅ्क्टर आला की,  धनुष स्वत:ला एका खोलीत कोंडून घेई. यानंतर वडील आणि भावाने धनुषला कसेबसे अभिनयासाठी राजी केले. धनुष म्हणायला मोठ्या दिग्दर्शकाचा मुलगा होता. पण तरीही त्याला टीका सहन करावी लागली. हिरो बनण्यासारखा तुझा चेहरा नाही, असे त्याला सर्रास ऐकवले जाई. पण प्रतिभा आणि आत्मविश्वास या जोरावर धनुषने साऊथ इंडस्ट्रीत स्वत:चे एक वेगळे स्थान निर्माण केले. केवळ इतकेच नाही तर बॉलिवूडमध्येही त्याने आपली प्रतिभा सिद्ध केली.

धनुष २००४ साली रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या हिच्यासोबत लग्नगाठीत अडकला. एका सिनेमाच्या स्पेशल स्क्रिनिंगवेळी दोघांची भेट झाली होती. या सिनेमातील धनुषचा अभिनय पाहून ऐश्वर्या कमालीची प्रभावित झाली होती. त्यानंतर तिने त्याला बुके पाठवला आणि हळूहळू दोघांमध्ये मैत्री वाढली. वर्षभरानंतर दोघे लग्नगाठीत अडकले. ऐश्वर्या धनुषपेक्षा दोन वर्षांनी मोठी आहे. 'कोलावरी डी' या प्रचंड लोकप्रिय झालेल्या गाण्याचे बोल स्वत: धनुषने लिहिले होते. असे म्हणतात धनुषने या गाण्याचे बोल केवळ सहा मिनिटांत लिहिले होते.

अभिनेता धनुषनं हिंदी सिनेमा इंडस्ट्रीत केवळ दोनच सिनेमे केले असले, तरी त्याचा इथं मोठा चाहतावर्ग आहे. सध्या तो दक्षिणेतच जास्त सक्रिय असला आणि बराच काळ हिंदी सिनेमांत दिसलेला नसला, तरी त्याला इथं काम करायचं आहे. धनुषला हिंदी सिनेमांत केवळ काम करायचं नाहीये, तर त्याला दिग्दर्शनही करायचं आहे.

धनुष याने हिंदी चित्रपटसृष्टीत आपली ओळख निर्माण केल्यावर हॉलिवूड तो चित्रपटात दिसला होता. 'द ग्रे मॅन' या हॉलिवूड चित्रपटात धनुषला कास्ट करण्यात आले असून या चित्रपटाचे दिग्दर्शन Avengers Endgame बनवणारा दिग्दर्शक रूसो ब्रदर्स केले आहे. या चित्रपटात हॉलिवूड स्टार क्रिस इवांस, रायन गॉसलिंग आणि अना दे अर्मस सारखे स्टारही दिसले होते.

'द ग्रे मॅन' य़ा हॉलिवूड चित्रपटापूर्वी धनुषने 'द एक्स्ट्रा ऑर्डिनरी जर्नी ऑफ द फकीर' या हॉलिवूड चित्रपटात काम केले होते.

#संजीव_वेलणकर पुणे.

९४२२३०१७३३

संदर्भ.इंटरनेट

ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.

मधुताई कांबीकर... आमची लाडकी बहिणाबाई...

डॉ.संतोष खेडलेकर,  संगमनेर

आज मधुताईंचा वाढदिवस. कुणाही जवळच्या व्यक्तीचा वाढदिवस म्हटले की मन आनंदाने भरून येते पण मागील काही वर्षांपासून मधुताईंचा वाढदिवस आला की मनात कालवाकालव होते ...काही नाती अशी असतात कि जी रक्ताच्या नात्यांपेक्षाही अधिक जिव्हाळा निर्माण करतात ... अशा नात्यांपैकी एक नाते म्हणजे माझ्या भगिनी मधुताई कांबीकर आणि माझे नाते. मराठी चित्रपटसृष्टीतील एक महत्वाचे नाव म्हणजे मधु कांबीकर. अगदी राजदत्त यांच्या शापित सारख्या चित्रपटांपासून ते तमाशावर आधारित एक होता विदुषक ते थेट दादा कोंडके यांच्या ' मला घेऊन चला ' सारख्या चित्रपटांमध्ये मधुताई चपखल बसायच्या हेच त्यांच्या अभिनयाचे वैशिष्ट्य. मागील १०-१५ वर्षात ताई सातत्याने संगमनेरला घरी यायच्या .. लक्ष्मीबाई कोल्हापूरकर प्रतिष्ठान म्हणजे ताईंच्या जिव्हाळ्याचा विषय, ताई प्रतिष्ठानच्या अध्यक्ष तर मी सदस्य प्रतिष्ठानचे सदस्य वेळोवेळी बदलले जात होते मी मात्र कायम होतो. प्रतिष्ठानच्या कामाच्या निमित्ताने, कार्यक्रमांच्या निमित्ताने पुण्याला ताईंच्या घरी जाणे व्हायचे. बऱ्याचदा सोबत अनेक मित्र असायचे मुळात त्यांना मधुताईंना भेटण्याची,  बघण्याची त्यांच्याशी बोलण्याची इच्छा असायची. माझ्यासोबत कितीही मित्रमंडळी असली तरी मधुताई सर्वाना घरीच जेवणाचा आग्रह करणार ...यात सुनवाई शीतल यांची अगत्यशीलता महत्वाची असायची.

' सखी माझी लावणी' हा मधु ताईंचा अतिशय गाजलेला कार्यक्रम. लावणीचा अस्सल बाज असलेला असा कार्यक्रम त्यापूर्वी कधी झाला नव्हता आणि पुढेही होणे शक्य वाटत नाही.पुढे काही  कारणांनी हा  कार्यक्रम बंद झाला.एकदा आमच्या लक्ष्मीबाई कोल्हापूरकर प्रतिष्ठानचा पुण्यात बालगंधर्व रंगमंदिरात कार्यक्रम होता प्रमुख अतिथी म्हणून डॉ मोहन आगाशे येणार होते. मधु ताई आणि डॉ आगाशे यांनी एक होता विदुषक चित्रपटात एकत्र काम केले होते. त्यात ताईंनी डॉ आगाशे यांच्यासमोर एक लावणी पेश केली होती. मी ताईंना आग्रह केला की तुम्ही बालगंधर्वला ही लावणी केलीच पाहिजे. ताई कार्यक्रमासाठी सहावार साडी नेसून आल्या होत्या लावणीसाठी अशी साडी अजिबात योग्य नसते पण माझ्या आग्रहाखातर ताईंनी त्या दिवशी अप्रतिम लावणी पेश केली.

काही वर्षांपूर्वी ज्येष्ठ साहित्यिक बलुतंकार दया पवार यांच्या परिवाराच्या वतीने देण्यात येणारा  दया पवार पुरस्कार जाहीर झाला योगायोग म्हणजे मधुताई आणि मला एकाच कार्यक्रमात पद्मश्री दया पवार प्रतिष्ठानच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. एकाच कार्यक्रमात बहिण भावांचा सन्मान होण्याचा मराठी कला क्षेत्रातला तो पहिलाच प्रसंग असावा.

एकदा लावणी सम्राज्ञी गुलाबबाई संगमनेरकर यांच्या अमृतमहोत्सवाचा कार्यक्रम होता. प्रमुख पाहुणे होते ज्येष्ठ कलारसिक आणि पुढे  सिक्कीमचे राज्यपाल झालेले  श्री. श्रीनिवास पाटील साहेब माझे जिवाभावाचे मित्र पानिपतकार विश्वास पाटील साहेब. या कार्यक्रमाला मधुताई, प्रसिद्ध ढोलकीपटू आमचे मित्र पांडुरंगदादा घोटकर हेही उपस्थित होते. गुलाबमावशी सत्काराला उत्तर द्यायला उभी राहिली आणि मावशीला माझ्यासह सर्वांनी लावणीचा आग्रह केला. मावशीनेही फारसे आढेवेढे न घेता लावणी सुरु केली. त्या दिवशी मधुताई सर्दीने बेजार झालेल्या होत्या पण खरा कलाकार त्याच्या जिव्हाळ्याचे  काही सुरु झालं कि स्वस्थ बसू शकत नाही .... मधुताईंच तेच झालं.. आजारी असलेल्या मधुताई गुलाबमावशीच्या लावणीवर अदाकारी करू लागल्या ... हे बघून आमचे पांडूरंग दादा स्वस्थ बसने शक्य नव्हते.. खर तर तिथे ढोलकी वगैरे काहीच नव्हत पण दादांची बोटे त्यांना चैन पडू देईना .. दादांनी तिथला एक फायबरचा टेबल घेतला तोच ढोलकी म्हणून वाजवायला सुरुवात केली आणि एक अनोखी जुगलबंदी सुरु झाली. भारतातला सर्वश्रेष्ठ ढोलकीपटू टेबल वाजवतोय, एक महान लावणी सम्राज्ञी लावणी गातेय आणि एक तितकीच श्रेष्ठ लावणी नृत्यांगना अदाकारी करतेय ... मला वाटते हा क्षण अनुभवणारे आम्ही खरच भाग्यवान होतो.

अशा कितीतरी आठवणी आहेत मधुताई आणि माझ्या परिवारच्या. काही वर्षांपूर्वी  मुंबईला एका कार्यक्रमात नृत्य करीत असतानाच मधुताई रंगमंचावर कोसळल्या. तेव्हापासून त्या कोमातच आहेत. कुणालाही ओळखत नाहीत .. मी जेव्हा ताईंना भेटायला गेलो तेव्हा  मी त्यापूर्वी  बघितलेली माझी सुंदर ताई... गप्पा मारणारी ताई डोळ्यासमोर आली आणि त्यादिवशी अंथरुणावर पडून असलेली हतबल ताई .. ताईंना भेटायला ज्या ज्या वेळी जातो तेव्हा सुरुवातीला ताई शून्यात डोळे लाऊन फक्त बघत असतात ..मग हळूच मी बोलायला सुरुवात करतो जुने तमाशा कलाकार...लक्ष्मीबाई ...राजदत्तजी ... असं काही काही सांगायला सुरुवात करतो आणि मधुताई माझा हात घट्ट धरतात ... ओठ पुटपुटायला लागतात पण शब्द फुटत नाही ... पण या हृदयीचे बोल त्या हृदयी थेट पोहचतात .. आम्ही मग डोळ्यांनीच खूप गप्पा मारतो ...ताई हतबल असतात मनात कालवाकालव सुरू होते ...मग मी फार वेळ नाही थांबू शकत तिथे ..नाही बघू शकत  कधीकाळी माझ्या सदैव हसऱ्या मधुताईंना त्या अवस्थेत... आता पुण्याला जाणे होते पण मधु ताईंना अशा हतबल अवस्थेत बघवत नाही .. मनात कुठेतरी आशा आहे की  ताई याही संकटातून, आजारपणातून बाहेर येतील. मला घरात येताच  थोरल्या बहिणीच्या मायेने  आलिंगन देणारी... जेवणाचा प्रेमळ आग्रह करणारी... खूप गप्पा मारणारी ताई भेटेल .. ताई लवकर बऱ्या व्हा याच आजच्या तुमच्या वाढदिवशी शुभेच्छा ..

आज २८ जुलै

आज प्रसिद्ध बंगाली साहित्यिक आणि ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या #महाश्वेतादेवी यांचा स्मृतिदिन.

जन्म. १४ जानेवारी १९२६ रोजी ढाका येथे. 

महाश्वेता देवी यांचे वडील मनीष घटक एक कवी आणि कादंबरीकार होते. महाश्वेतादेवी किशोरवयीन असतानाच त्यांचे कुटुंबीय पश्चिम बंगालमध्ये स्थायिक झाले. तिथेच त्यांनी आपले पदव्युत्तर शिक्षणही पूर्ण केले. लहान वयातच त्यांनी लिखाणाला सुरुवात केली होती. इंग्रजी विषयातून पदव्युत्तर पदवी संपादन केल्यानंतर त्यांनी शिक्षिका आणि पत्रकार म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. महाश्वेतादेवी यांच्या साहित्य व सामाजिक क्षेत्रातील अतुलनीय कार्याबद्दल त्यांना पद्मविभूषण, मॅगसेसे, साहित्य अकादमी आणि ज्ञानपीठ पुरस्काराने गौरवण्यात आले. साहित्य संपदा ज्ञानपीठ, साहित्य अकादमी हे साहित्य क्षेत्रातील मानाचे पुरस्कार मिळवणा-या महाश्वेता देवी यांनी बंगाली भाषेतून लघुकथा, कादंब-या असे विपुल लिखाण केले आहे. त्यांच्या झाँसी की रानी’, हजार चौराशीर की माँ, रुदाली या कादंब-या मैलाचा दगड ठरल्या. इतर ग्रंथसंपदेत अरण्यार अधिकार, अग्निगर्भ, सिद्धू कनहुर दाके आदी साहित्य वाचकांच्या पसंतीस उतरले. यापैकी हजार चौराशीर की माँ, या त्यांच्या बंगाली भाषेतील कादंबरीवर आधारित गोविंद निहलानी दिग्दर्शित सिनेमा १९९८ साली रुपेरी पडद्यावर झळकला होता. या कादंबरीद्वारे महाश्वेता देवी यांनी नक्षलवादी चळवळीशी जोडला गेलेला मुलगा व त्याची आई यांची संघर्षकथा मांडली. १९९३ साली कल्पना लाजमी यांनी महाश्वेता देवी यांच्या रुदालीया कादंबरीवर आधारित चित्रपट बनवला होता. म्हादू हा मराठी चित्रपटही त्यांच्या कथेवर बनला आहे. महाश्वेता देवी यांचे २८ जुलै २०१६ रोजी निधन झाले.

#संजीव_वेलणकर पुणे.

९४२२३०१७३३

संदर्भ.इंटरनेट

ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.

आज २८ जुलै

आज बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री #हुमा_कुरेशी चा वाढदिवस.

जन्म. २८ जुलै १९८६ दिल्ली येथे.

हुमा कुरेशी एका संवेदनशील अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. हुमा कुरेशीने दिल्ली युनिव्हर्सिटीच्या गार्गी कॉलेजमधून इतिहासात बॅचलर डिग्री घेतली आहे. त्याचबरोबर ती दिल्लीच्या थिएटर ग्रुपशी संलग्न होती. हुमा कुरेशीने तिच्या अभिनयाची सुरुवात छोट्या-मोठ्या जाहिरातींमधून केली. पिअर्स साबण, सॅमसंग आणि नेरोलेकच्या जाहिरातींमध्ये ती झळकली होती. जेव्हा ती एका जाहिरातीच्या शूटिंगसाठी मुंबईत आली होती, तेव्हा दिग्दर्शक अनुराग कश्यप यांची नजर तिच्यावर पडली. जाहिरातीमधील हुमाचे काम बघून अनुराग खूपच प्रभावित झाले. पुढे त्यांनी तिला थेट त्यांच्या चित्रपटात काम करण्याचे निमंत्रण दिले.

दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या गॅँग्स ऑफ वासेपुरया चित्रपटातून हुमाने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. जेव्हा हुमा इंडस्ट्रीत आली तेव्हा तिच्यावर काहींनी टीकाही केली. परंतु तिने अभिनयाच्या जोरावर टीकाकारांना उत्तर दिले. गॅँग्स ऑफ वासेपुरमधील तिचा अभिनया एवढा सर्वोत्कृष्ट जमला की, या चित्रपटाचा दुसरा भागही प्रेक्षकांच्या भेटीस आली. दोन्ही भागांमध्ये हुमाने केलेल्या उत्कृष्ट अभिनयामुळे ती चांगलीच चर्चेत आली होती. पुढे तिचे नाव थेट सोहेल खानशी जोडले गेल्याने, तिला ओळखही मिळाली. तिचा भाऊ साकीब सलीम दिग्दर्शक आहे. हुमा कुरेशीने इंडिया बेस्ट ड्रामेबाजया रिअॅलिटी शोचं परिक्षकपद भूषवले होते.

सं|जी|व वे||||र पुणे.

९४२२३०१७३३

संदर्भ.इंटरनेट

ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.

आज २८ जुलै

आज ज्येष्ठ अभिनेत्री व नृत्यांगना #मधू_कांबीकर यांचा वाढदिवस.

जन्म.२८ जुलै १९५३

मधू कांबीकर या नुसतीच उत्तम नर्तिका नाहीत, तर उत्तम अभिनेत्री आहेत असा उल्लेख श्रीराम लागू यांच्या लमाणया आत्मकथनात आढळतो. अभिनयाच्या जोरावर श्रीराम लागूंसारख्या ज्येष्ठ अभिनेत्याकडून कौतुकाची थाप मिळवलेल्या मधू कांबीकर ऊर्फ मधू वामन जाधव यांचा जन्म बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील मालेगाव येथे झाला. तेथेच त्यांनी तिसरीपर्यंतचे शिक्षण घेतले व त्या पुढचे सातवीपर्यंतचे शिक्षण कांबी या गावी पूर्ण केले. वयाच्या ११व्या वर्षी त्यांनी पुण्याच्या बाळासाहेब गोखले यांच्याकडे कथ्थक नृत्याचे शिक्षण घेतले, तर वयाच्या १३-१४ व्या वर्षी मधू कांबीकर यांनी गुरू पांडुरंग घोटीकर व लावणीसम्राज्ञी लक्ष्मीबाई कोल्हापूरकर यांच्याकडे लावणी नृत्याचे धडे घेतले. येथूनच मधू कांबीकर यांचा लोककलेचा प्रवास खर्याण अर्थाने सुरू झाला.

एकीकडे लोककलाकार म्हणून नाव गाजत असतानाच दुसरीकडे लोककलाकार म्हणूनच त्यांना समाजाच्या अवहेलनेचा विषय व्हावे लागत होते, पण त्यानेही खचून न जाता मधू कांबीकर यांनी चित्रपटसृष्टीत कोणाच्याही मदतीशिवाय केलेला प्रवेश त्यांच्या धडपड्या वृत्तीचा निदर्शक असल्याचे लक्षात येते. चित्रपटात प्रवेश करण्यापूर्वी त्यांना प्रभाकर पणशीकर यांनी पुत्रकामेष्टी’ (१९८०) या अनिल बर्वे लिखित नाटकात काम करण्यासाठी बोलावले. येथेही त्यांना लोककलावंत म्हणून हिणवले गेले, पण या काळात मोठ्या हिमतीने त्यांच्या मागे वडीलकीच्या नात्याने उभे राहिले ते प्रभाकर पणशीकर. त्यांच्या सहकार्याने व आपुलकीने भारावलेल्या मधूबाईंनी या नाटकात केलेला अभिनय उत्कृष्ट ठरला व त्या वर्षीचा नाट्यदर्पणचा विशेष लक्षवेधी अभिनेत्रीचा पुरस्कार त्यांनी पटकावला. त्यानंतर मधू कांबीकर यांनी पेईंग गेस्ट’, ‘चंद्र जिथे उगवत नाही’, ‘आकाश पेलताना’, ‘फुलवंतीअशा १९ नाटकांमधून काम केलेले आहे.

याच दरम्यान त्यांनी सतीची पुण्याई’, ‘दगा’, ‘लक्ष्मीयांसारख्या चित्रपटांमध्ये छोट्या-छोट्या भूमिका केल्या आहेत. पण त्यांना चित्रपटसृष्टीत नावलौकिक प्राप्त झाला तो शापितमुळे. ग्रामीण राहणीमान, ग्रामीण हेलातील बोलणे व चालण्या-बोलण्यात ग्रामीण ढंग यांमुळे ३६-३७ मुलींमधून मधूबाईंची निवड झाली, हे विशेष. स्नेहलता दसनूरकर यांच्या वज्रदीपया कादंबरीवर आधारलेल्या शापितया चित्रपटाची पटकथा ग. रा. कामत यांनी लिहिली होती. यात बिजलीनावाच्या ग्रामीण, खेडवळ व वेठबिगार असलेल्या पुरुषाच्या पत्नीची भूमिका मधू कांबीकरांना वठवायची होती. स्वत:चे बालपण खेड्यात गेलेले असल्यामुळे त्यांना ही भूमिका सहज करता आली असती. पण तरीही या भूमिकेला न्याय देण्यासाठी त्यांनी पुन्हा एकदा खेड्यात जाऊन ग्रामीण स्त्रीच्या देहबोलीचा अभ्यास केला व त्या जाणिवा भूमिकेशी पडताळून पाहून मगच अभिनय केला. या चित्रपटातील बिजलीही व्यक्तिरेखा सुंदर नवविवाहित स्त्री म्हणून चित्रपटाच्या सुरुवातीला समोर येते व चित्रपटाच्या शेवटी ती कणखर, आलेल्या अनुभवांनी आपले जीवन सक्षमपणे जगणारी एक बलवान स्त्री होते. सुंदर रूप व गरिबी यांच्यामुळे तिच्या आयुष्याचा झालेला विचका शोकमय आहे. या शोकमय जीवनाचा आलेख, अक्षमतेपासून सक्षमतेपर्यंतचा बिजलीया व्यक्तिरेखेचा प्रवास मधू कांबीकर यांनी आपल्या अभिनयातून ताकदीने उभा केला. खेडवळ स्त्रीची बसण्या-उठण्याची, बोलण्या-हसण्याची, तिच्या व्यक्तिगत व सामाजिक संघर्षाची, मुलाप्रती असणार्या तिच्या ममत्वाची, आपल्या स्त्री अस्मितेचा अपमान झाला, त्याला नवरा जबाबदार असल्यामुळे त्यांच्यावर आयुष्यभर असणार्या रोषाची निरनिराळी रूपे मधू कांबीकरांनी आपल्या अभिनयाने संपन्न केली. त्यांच्या या अभिनयासाठी त्यांना १९८३ सालची सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून राज्य शासनाने गौरवले, तसेच फिल्मफेअरहा मानाचा पुरस्कारही लाभला. अभिनयाची कारकीर्द सुरू झाल्या झाल्या मानाचे पुरस्कार मधू कांबीकरांना लाभले, यातूनच त्यांची अभिनयक्षमता ध्यानात येते. ही अभिनयक्षमता राजदत्त यांच्यासारख्या दिग्दर्शकाने हेरली व त्यांचे चीज केले, हेही वाखाणण्यासारखे आहे. तेव्हाच मधू कांबीकर यांनी राजदत्त यांना आपले गुरू मानले, ते कायमचे.

यानंतरचा त्यांचा चित्रपट म्हणजे राघू मैना’ (१९८२). वसंत सबनीस लिखित ही पटकथा लोककलेत काम करणार्या कलावंताची दुर्दशा दाखवणारी आहे. यात त्यांच्यासोबत निळू फुले, अशोक सराफ व नाना पाटेकर यांच्यासारख्या दिग्गज कलाकारांनी कामे केली होती. राजदत्त यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटातील अभिनयासाठी राज्य शासनाच्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्कारासाठी मधू कांबीकर यांचे नामांकन झाले होते.

या दोन चित्रपटांच्या यशस्वी कारकिर्दीनंतर मधूबाईंना एक ते दीड वर्ष कामे मिळाली नाहीत, पण १९८४ साली त्यांना हेच माझे माहेरनावाचा चित्रपट मिळाला. यातील मामा-मामींनी सांभाळ केलेल्या अनाथ शकूची भूमिका त्यांनी केली. आयुष्यभर दु:ख पाहिलेल्या अनाथ मुलीचा लग्नानंतरही सासरी छळ होतो, एका मुलाच्या जन्मानंतर नवर्याचा मृत्यू होतो व तिचे आयुष्य आणखी वैराण होते, पण मुलाला सांभाळण्याची जबाबदारी समर्थपणे ती पेलते व आपल्या मुलाला मोठे करते. अनाथ मुलगी ते कर्तव्यदक्ष माता असा शकूया व्यक्तिरेखेचा बहुआयामी प्रवास त्यांनी आपल्या अभिनयातून समर्थपणे साकारल्यामुळेच या भूमिकेसाठी त्यांना १९८५चा महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार लाभला.

मधू कांबीकर यांचा पुढील टप्प्यातील महत्त्वाचा चित्रपट म्हणजे एक होता विदूषक’. पुलंची पटकथा, ना.धों. महानोर यांच्या लावण्या, लक्ष्मीबाई कोल्हापूरकर यांचे नृत्यदिग्दर्शन, डॉ. जब्बार पटेल यांचे दिग्दर्शन व लक्ष्मीकांत बेर्डे यांची भूमिका. यातला मधू कांबीकर यांचा अभिनय कलावंत आईचा संघर्ष मांडणारा आहे. हा संघर्ष वयात आलेल्या आपल्या मुलाबरोबर तमाशाच्या फडात काम करताना आपल्या वयाचे भान ठेवण्याचे तारतम्य व त्याच वेळेस आपल्या कलेला न्याय देण्याचा ध्यास, असा दुहेरी पातळीवरचा आहे. आपल्या कलेवर निरतिशय प्रेम असणारी ही कलावंत स्त्री आपल्या मुलावर कलेइतकेच निर्व्याज प्रेम करते. हा दोन टोकातला संघर्ष या बाणेदार व स्वाभिमानी स्त्रीला सतत अस्वस्थ करत राहतो, ते अस्वस्थपण त्यांनी आपल्या अभिनयातून प्रत्ययकारी पद्धतीने मांडले आहे. याचे मूळ आपल्याला त्यांच्या मधुरंगआत्मकथनातील काही भागांमध्ये पाहायला मिळते. त्यांच्या वास्तव अभिनय कारकिर्दीमधील ठसठसते दु:ख प्रेक्षकांना एक होता विदूषकया चित्रपटाच्या माध्यमातून, त्यातल्या त्यांच्या अस्सल अभिनयातून पाहायला मिळते. त्यामुळेच एका आईचे अस्वस्थपण या भूमिकेच्या माध्यमातून त्या नेटकेपणाने, सहजपणाने व वास्तवरीत्या मांडू शकल्या असे वाटते. या चित्रपटाची निवड इंडियन पॅनोरमात झाली होती, तसेच राज्य शासनाच्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्कारासाठीही मधूबाईंचे नामांकन झाले होते.

यशाच्या शिखरावर पोहोचलेल्या मधू कांबीकर यांनी त्यानंतर रावसाहेबया चित्रपटात काम केले व त्यातील अभिनयासाठीही त्यांना १९९६ सालचा राज्य शासनाचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. १९९९ साली त्यांनी सादनावाचा गुजराती चित्रपटात काम केले. त्यातील त्यांच्या संवादरहित आंगिक अभिनयासाठी त्यांना गुजराथ राज्य शासनाचे सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे पारितोषिक मिळाले. २००१ व २००२ साली प्रदर्शित झालेल्या आई कुलस्वामिनी तुळजाभवानीसंघर्ष जीवनाचाया चित्रपटातील भूमिकांसाठीही त्यांना राज्य शासनाचे सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे पुरस्कार लाभलेले आहेत, तर २००५ व २००६ साली आलेल्या राजा पंढरीचासवाल माझ्या प्रेमाचा’, ‘संत गाडगे महाराज’, ‘तीया चित्रपटांसाठी नामांकन झाले होते. त्यांनी दादा कोंडके यांच्याबरोबर काम केलेल्या ह्योच नवरा पायजे’, ‘मला घेऊन चला’, ‘येऊ का घरातया चित्रपटांनाही यश मिळाले. याशिवाय त्यांचे बिनकामाचा नवरा’, ‘मुंबईचा डबेवाला’, ‘रणरागिनी’, ‘दुसर्याग जगातली’, ‘पैज लग्नाची’, ‘अशी असावी सासू’, ‘झपाटलेलाआदी चित्रपटही प्रेक्षकांच्या लक्षात राहिले आहेत. त्यांनी होळी रे होळी’, ‘सर्जा राजा’, ‘वैभव’, ‘संत गाडगे महाराज’, ‘श्रावणधारा’, ‘मुक्तीयांसारख्या दूरदर्शन मालिकांमध्येही काम केलेले आहे. तसेच त्यांनी मधुप्रीतम’ (१९९६) नावाची संस्था स्थापन करून त्याद्वारे अभिजात पारंपरिक लावणी या लोककलेचे जतन व संवर्धन करणारा सखी माझी लावणीहा कार्यक्रम सातत्याने सादर केला. या माध्यमातून पेशवेकालीन पारंपरिक लावणी व तिचा इतिहास रेखाटण्याचे मधू कांबीकर यांचे काम उल्लेखनीय आहे. तसेच नृत्यासाठी राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त केलेल्या लावणीसम्राज्ञी लक्ष्मीबाई कोल्हापूरकर यांच्या नावे लक्ष्मीबाई कोल्हापूरकर प्रतिष्ठानची स्थापना ही त्यांच्या लोककलेशी असणार्याा इमानाची ग्वाही देणारी आहे. त्यांनी ओमप्रीतमनावाची आपली निर्मिती संस्था स्थापन करून काटा रुते कुणालानावाच्या टेलिफिल्मची निर्मितीही केली होती.

लोकनाट्य-नाटक-दूरदर्शन मालिका-चित्रपट असा चौफेर प्रवास करणार्या मधू कांबीकर यांनी आपल्या बहुआयामी अभिनयकौशल्याने मराठी चित्रपटसृष्टीत स्वत:चे ठाम, निश्चित व आवर्जून दखल घेतले जाणारे स्थान निर्माण केलेले आहे. डिसेंबर २०१६ मध्ये लावण्य संगीतया कार्यक्रमाच्या सादरीकरणावेळीच त्या रंगमंचावर बेशुद्ध झाल्या होत्या. मेंदूमध्ये रक्ताच्या गाठी झाल्याच्या निदानानंतर त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया झाली. मात्र, त्यामुळे त्यांना अभिनयापासून काही काळ दूर राहावे लागले होते.

#संजीव_वेलणकर पुणे.

९४२२३०१७३३

संदर्भ.इंटरनेट/ डॉ.अर्चना कुडतरकर

ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.

आज २८ जुलै

आज मराठीतील प्रसिध्द शाहीर #पिराजीरामजीसरनाईक यांचा स्मृतिदिन.

जन्म.२८ जुलै

शाहीर तिलक, शाहीर विशारद आणि करवीर दरबारचे शाहीर व  लहरी हैदर गुरूजी माझे शीघ्र कवी थोर! त्यांच्या कृपेने शाहीर पिराजी पोवाडा लिहिणार!असे म्हणणा-या पिराजी रामजी सरनाईक या शाहिराने आपल्या खडय़ा आवाजात अनेक चित्रपटांतून, नाटकांतून, वीररसाने ओथंबलेले पोवाडे म्हटले आणि पिचलेल्या मनगटातही जान आणली, छातीत स्फुरण आणले. कोल्हापुरात शिवाजी पेठेत उभा मारूती चौकातसन १९३३ मध्ये त्यांनी पहिला पोवाडा म्हटला तो बाजीप्रभूंचा! सावकारी पाश या चिटपटातील पोवाडय़ाने त्यांना अमाप प्रसिद्धी मिळाली. मुंबईच्या हिज मास्टर्स व्हाईस कंपनीने १९३७ मध्ये मुंबईची कहाणी हे त्यांचे पहिले ग्रामोफोन रेकॉर्डिग केले. पोलीस कचेरीतील कारकुनाची नोकरी सन १९५० मध्ये सोडून देऊन पिराजीरावांनी पूर्ण वेळ शाहिरीला वाहून घेतले. छ. शहाजी महाराजांनी त्यांना शाहीर विशारदहा किताब व तहहयात मानधन दिले. महाराष्ट्र शाहिरी संमेलनाने त्यांना शाहीर तिलकम्हणून गौरवले. म्यानातून तलवार उपसावीअसा शाहिरांचा आवाज बाहेर पडतोअशा शब्दांत शिवभक्त भालजींनी ज्यांना गौरव केला, असे हे शाहीर पिराजीराव! ज्यांच्या शंभरावर पोवाडय़ांच्या रेकॉर्डस प्रसारित झाल्या, असा हा करवीर शाहीर. जुनं ते सोनंहा त्यांच्या गाजलेल्या पोवडय़ांचा संग्रह आहे.  शाहीर पिराजी रामजी सरनाईक यांचे ३० डिसेंबर १९९२ रोजी निधन झाले.

#संजीव_वेलणकर पुणे.

९४२२३०१७३३

संदर्भ.इंटरनेट

ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.

आज २८ जुलै

आज प्रख्यात तबलावादक पंडित #सदाशिव_पवार यांचा जन्मदिन.

जन्म. २८ जुलै १९३४

पं. सदाशिव पवार यांचे साता-यामधील मापरवाडी हे मूळगाव होते.वयाच्या ११ व्या वर्षी त्यांना तबला वादनाची आवड निर्माण झाली. त्यामुळे ते मुंबईत आले. प्रारंभीचे तबला वादनाचे शिक्षण पं. चतुर्भुज राठोड यांच्याकडे आणि पुढचे शिक्षण फारूखाबाद घराण्याचे खलिफा उस्ताद आमीर हुसेन खॉँ यांच्याकडे घेतले.

तब्बल पन्नासहून अधिक वर्षं पं.पवारांनी उस्ताद अब्दुल हलीम जाफर खाँ साहेबांना साथसंगत केली. बारा तासांचा रोजचा रियाझ, आणि आपल्या स्वतंत्र वादनशैलीमुळे ते लोकप्रिय तर झालेच, परंतु गेल्या साठ-पासष्ट वर्षातील तमाम गायकांना साथ दिली.

पं. सदाशिव पवारांनी डोंबिवलीत १९८३ साली सदाशिव अॅकॅडेमी ऑफ म्युझिकची स्थापना केली आणि जागतिक कीर्तीच्या गायक-वादकांचे कार्यक्रम डोंबिवलीकर रसिकांपुढे सादर केले.

देशभरातील बहुतांश सुविख्यात शहरांमध्ये त्यांचे साथसंगतीचे आणि एकल वादनाचे कार्यक्रम झाले. याबरोबरच भारताबाहेर अमेरिका, कॅनडा, मॉरिशस, अफगाणिस्थान, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान आदी अनेक देशांमध्येही त्यांनी कार्यक्रम सादर केले.

पं. सदाशिव पवारांना डोंबिवली भूषण पुरस्कार, चतुरंग सन्मान, हलीन अॅकॅडेमी ऑफ सितारचा शरावती पुरस्कार, स्वरांकुर सन्मान, शारदा संगीत संस्थेचा सन्मान, आणि पं. राम मराठे  स्मृति पुरस्काराने गौरवण्यात आले होते. पंडित सदाशिव पवार यांचे ७ सप्टेंबर २०१७ रोजी निधन झाले.

#संजीव_वेलणकर पुणे.

९४२२३०१७३३

संदर्भ.इंटरनेट

ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.

आज २८ जुलै

आज बनारस घराण्याचे प्रख्यात तबलावादक पंडित #लच्छू_महाराज यांचा स्मृतिदिन.

जन्म. १६ ऑक्टोबर १९४४ वाराणसी येथे.

तबला हे भारतीय अभिजात संगीतातील अविभाज्य अंग नेमके कधी झाले, याची नोंद नाही. मात्र तबल्याच्या, म्हणजेच लयीच्या साथीशिवाय संगीत पूर्ण होऊ शकत नाही, अशी स्थिती त्यामुळे निर्माण झाली. संगीत ऐकणाऱ्या सामान्य रसिकांना हेही माहीत असण्याचे कारण नाही, की तबल्याच्या क्षेत्रात गेल्या काही शतकांमध्ये प्रचंड म्हणावे असे सर्जन झाले आहे. अभिजात संगीतातील घराणी म्हणजे गायन सादर करण्याची शैली. अशाच प्रकारच्या शैली तबलावादनातही निर्माण झाल्या. बनारस हे त्यातील एक नामांकित घराणे. लच्छू महाराज हे या घराण्यातील सध्याच्या काळातील आदरणीय कलावंत. यापूर्वी निवर्तलेले पं. किशन महाराज हेही याच घराण्याचे.

लच्छू महाराज यांनी आयुष्यभर तालाची साधना केली. त्यांचे मूळ नाव लक्ष्मीनारायण सिंह. त्यांचे वडील वासुदेव नारायण सिंह यांच्याकडून त्यांनी तालाची तालीम घेतली. लच्छू  महाराज  यांनी  साधारण  दहा  वर्ष  पंडित बिंदिदिन  महाराज,  त्यांचे  काका  आणि  अवधचे  नवाबच्या  अदालती  नर्तक  यांच्याकडून  संपूर्ण  प्रशिक्षण घेतलं.  लच्छू महाराज यांनी या शहरात नाव मिळवले, मात्र ते लोकप्रिय झाले ते चित्रपट संगीताच्या क्षेत्रात. तिथे त्यांनी महल, मुगल-ए-आजम, छोटी छोटी बाते, आणि पाकीजा सारख्या चित्रपटांमध्ये तबलावादन केले. सामान्यत: चित्रपट संगीतातील साथीदार कलावंतांची नावेही माहीत होत नाहीत. लच्छू महाराज यांच्यासारख्या अनेक गुणी कलावंतांनी या संगीतात आपल्या कलेने अतिशय मोलाची भर घातली आहे. लच्छू महाराजांसारख्या कलावंतांनी ही अपार साधना तर केलीच; पण त्यामध्ये नवसर्जनही केले. गणिती पद्धतीने तालाच्या मात्रांचा हिशेब करता करता, त्यातून लयीचा देखणा ताजमहाल उभा करणे, ही सोपी गोष्ट नसते. त्यासाठी परिश्रमांबरोबरच प्रज्ञेचीही आवश्यकता असते. लच्छू महाराज यांच्याकडे ती होती. त्यामुळेच केवळ ते रसिकांचे प्रेम मिळवू शकले. तालाच्या अगाध दुनियेत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी त्यांनी केलेली साधना आणि त्याच्या बरोबरीने अंगी असलेली सर्जनशीलता कुणालाही हेवा वाटावी अशीच होती. अलीकडील संगीत मैफलींमध्ये वाद्यवादनात तबल्याबरोबरच्या जुगलबंदीचे प्रस्थ वाढते आहे. तबलावादक आणि वाद्यवादक यांच्यातील सवाल-जवाबला रसिकांकडून वाहवाही मिळत असते. वाद्यवादनात तबलावादकास स्वत:ची स्वतंत्र ओळख निर्माण करता येते, हे खरे असले तरीही गायनाच्या वेळी तबलजीने केलेली नम्र संगत गायकाला नवसर्जनाची ताकदच देत असते. लच्छू महाराज यांनी हे नेमके ओळखले होते आणि त्यामुळेच ते आपल्या कलेशी इमान राखू शकले. लच्छू महाराज यांना पद्मश्री पुरस्कार देण्याचे केंद्र सरकारने ठरवले होते, मात्र प्रेक्षकांकडून मिळालेल्या सन्मानापेक्षा कुठलाही पुरस्कार मोठा नसल्याचे सांगून त्यांनी तो नाकारला होता. अभिनेता गोविंदा हे लच्छू महाराज यांचा भाचा असून त्यांनी लहानपणीच लच्छू महाराजांना आपला गुरू मानलं होतं. लच्छू महाराज यांचे २८ जुलै २०१६ रोजी निधन झाले.

#संजीव_वेलणकर पुणे.

९४२२३०१७३३

संदर्भ.इंटरनेट

ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.

आज २८ जुलै

आज मराठीतले एक यशस्वी दिग्दर्शक #राजा_ठाकूर यांचा स्मृतिदिन.

जन्म. २६ नोव्हेंबर १९२३

दोन-तीन चित्रपटात राजा ठाकूरांनी जुन्नरकरांबरोबर संकलनात सहाय्यक म्हणून काम केले. १९४७ साली संगीतकार शंकरराव पवार यांना जी. एम. शहा नावाचा निर्माता भेटला. त्याला चित्रपट काढायचा होता. शंकररावांनी त्याला राजाभाऊ परांजपे यांचं नाव दिग्दर्शक म्हणून सुचवलं. राजाभाऊंनी राजा ठाकूरचं संकलनाचं काम पाहिलं होतं. व राजा ठाकूर यांच्यावर संकलनाची जबाबदारी सोपवली. चित्रपटाचं नाव होतं बलिदान. १९४७ च्या बलिदानपासून ते १९५३ पर्यंत सुमारे १५ चित्रपटांचं संकलन राजानं केलं आणि मराठी चित्रपटसृष्टीत एक उत्तम संकलक म्हणून नाव मिळवलं. संकलक राजा ठाकूर हे दिग्दर्शक राजाभाऊ परांजपे यांचे घनिष्ठ सहकारी होते. छायाचित्रकार बाळ बापट आणि संकलक राजा टाकूर हे राजाभाऊ परांजप्यांचे डावे-उजवे हात होते. राजा ठाकुरांनी संकलक म्हणून नाव कमावलं. परंतु त्यांच्या मनात एक प्रतिभावंतकल्पक दिग्दर्शक दडला होता. १९५३ सालच्या बोलविता धनीया चित्रपटापासून राजा ठाकूर यांची दिग्दर्शक म्हणून कारकीर्द सुरु झाली. १९५३ ते १९७५ या २३ वर्षांत त्यांनी २० मराठी, २ हिंदी व बिरबल ब्रदरया इंग्रजी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं. दिग्दर्शक म्हणून राजा ठाकूरांची अनेक वैशिष्ठ्ये होती. उत्तम साहित्यिकांकडून त्यांनी पटकथा-संवाद लिहून घेतले. त्यात ग. दि. माडगूळकर, ग. रा. कामत, मधुसूदन कालेलकर, शं. ना. नवरे, राम केळकर, पु. भा. भावे, सुरेश खरे, रणजित देसाई अशी मंडळी होती. यातील शं. ना. नवरे, पु. भा. भावे, सुरेश खरे, राम केळकर व रणजित देसाई यांना त्यांनीच आग्रह करून पटकथा-संवाद लेखक बनवले. ठाकुरांच्या चित्रपटांचे मूळ कथा लेखक दत्त रघुनाथ कवठेकर, अरविंद गोखले, चिं. वि. जोशी, पं. महादेव शास्त्री जोशी, द. ग. गोडसे, बाबुराव अर्नाळकर, वसुंधरा पटवर्धन, व. पु. काळे, ग. वा. बेहेरे असे ख्यातकीर्त साहित्यिक होते. मराठी चित्रपटसृष्टीत त्याकाळी तमाशा, लावणी, पाटील व कुर्हाटड यांचा वापर करणार्या ग्रामीण चित्रपटांची चलती होती. पण राजा ठाकूर त्या वाटेला गेले नाहीत. त्यांच्या चित्रपटांपैकी मी तुळस तुझ्या अंगणीआणि रंगल्या रात्री अशाया दोन्ही चित्रपटांचं कथानक जरी तमाशाप्रधान असलं तरी तिथे चाळांचा किंवा लावण्यांचा उपयोग गल्ल्यासाठी केला नव्हता. राजा ठाकुरांनी सामाजिक चित्रपट दिले. पण त्याबरोबर गजगौरीसारखा पौराणिक, ‘राजगडचा राजबंदीसारखा ऐतिहासिक, ‘गोरा कुंभारसारखा संतपट आणि मी तुळस तुझ्या अंगणीरंगल्या रात्री अशासारखे थोडा तमाशा दाखवणारे चित्रपट दिले. बिरबल माय ब्रदरसारखा इंग्रजी चित्रपट दिग्दर्शित करणारे ते पहिले मराठी दिग्दर्शक होते. याच चित्रपटानं त्यांना हिंदी चित्रपटसृष्टीचं दार खुलं केलं. जखमीने अनेक ठिकाणी रौप्यमहोत्सव साजरा केला. जखमीनंतर रईसजादाहा हिंदी चित्रपट राजा ठाकुरांनी करायला घेतला. हा चित्रपट त्यांच्या हयातीत पुरा होऊ शकला नाही. राजा ठाकूर यांना महाराष्ट्र राज्य चित्रपट महोत्सवात सहा वेळा उत्कृष्ट चित्रपटाचा व सहा वेळा उत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार मिळाला. त्यांच्या तंत्रज्ञालाही अनेक पुरस्कार मिळाले. मी तुळस तुझ्या अंगणी’, ‘रंगल्या रात्री अशा’, ‘एकटीमुंबईचा जावईया चार चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले. शांत स्वभावाचे राजा ठाकूर साहित्यिक, कलावंत नट, यांच्यात रमत. त्यांचा सुसंस्कृतपणा बोलण्यात व आचरणातून दिसत असे.राजा ठाकूर यांचे २८ जुलै १९७५ रोजी निधन झाले.

#संजीव_वेलणकर पुणे.

९४२२३०१७३३

संदर्भ. इंटरनेट/ मधू पोतदार

ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.

आज २८ जुलै

आज ज्येष्ठ अभिनेत्री #लिला_नायडू यांचा स्मृतिदिन.

जन्म. १९४०

लीला नायडू यांचे पिता, डॉ. रामैय्या नायडू एक ख्यातनाम अणु संशोधक होते तर आई स्विस मुळची. त्यांच्या कडूनच लीला नायडू यांना भारतीय आणि युरोपियन मिश्रित सौंदर्याचा वारसा मिळाला होता.  लिला नायडू यांनी १९५४ साली 'मिस इंडिया' हा बहुमान पटकावला होता. बलराज साहनी यांच्या 'अनुराधा' चित्रपटापासून नायडू यांनी १९६० मध्ये चित्रपटातील कारकिर्दीस प्रारंभ केला होता. "वोग" (Vogue ) सारख्या आंतरराष्ट्रीय आणि ख्यातनाम मासिकाने १९५०-६० च्या दशकात या आकर्षक आणि डौलदार व्यक्तिमत्वाच्या धनी असलेल्या अभिनेत्रीचा समावेश "जगातील १० अति सुंदर" महिलांमध्ये केला होता. हृषीकेश मुखर्जी यांनी डायरेक्ट केलेला "अनुराधा" हा लीला नायडू यांचा बॉलीवूड मधील पहिला चित्रपट. या चित्रपटात त्यांनी अशा एकाकी पडलेल्या पत्नीची भूमिका अतिशय उठावदार पणे केली कि जी आपले सारे गानविश्वातील करिअर आपल्या डॉक्टर पतीकरता (बलराज सहानी) करिता सोडून देते. या चित्रपटाची गणना एका महान बॉलीवूड चित्रपटांमध्ये होते. पंडित रविशंकर यांनी दिलेले श्रवणीय संगीत (जाने कैसे सपनोमे, कैसे दिन बीते इ. गाणी) आणि बलराज सहानी यांचा दमदार अभिनय ह्या "अनुराधा" या चित्रपटाच्या इतर जमेच्या बाजू! या चित्रपटाला १९६१ चा भारत सरकारचा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार आणि बर्लिन आंतराराष्ट्रीय फिल्मोत्सव पुरस्कार मिळाला! "येह रास्ते हैं प्यारके" हा त्यांचा अजून एक गाजलेला चित्रपट (१९६३)! ह्या चित्रपटाची कथा त्या वेळच्या गाजलेल्या "नानावटी प्रेमप्रकरण" यावर आधारित होती. ह्या चित्रपटात सुनील दत्त, रेहमान आणि लीला नायडू यांनी हा प्रेमाचा त्रिकोण अतिशय समर्थपणे साकारला आहे. खरे तर, ही अपारंपारिक भूमिका स्वीकारावयास त्या वेळच्या कोणत्याही प्रसिद्ध नायिका तयार नव्हत्या. पण लीला नायडू यांचा दाखविलेला धीटपणा त्यांच्या चांगलाच उपयोगी पडला आणि हा चित्रपट हिट ठरला! पहिल्या दोन-तीन चित्रपटांनंतर ओबेरॉय हॉटेल समूहाच्या तिलकराज ओबेरॉय यांच्याशी विवाह करून त्यांनी चित्रपटसृष्टी सोडली. पुढे घटस्फोट झाला आणि पत्रकार डॉम मोराएस यांच्याशी लिला नायडू यांनी विवाह केला. दहा वर्षे ती हाँगकाँगमध्ये राहिल्या. तिथे त्यांनी काही रेडिओ प्रोग्रॅम केले. तिथल्या चित्रपटांसाठी डबिंगही ती करीत असे. त्यांनी आपल्या जीवनाची शेवटची काही वर्षे एकाकीपाणेच घालविली. या एकटेपणात त्यांना जे. कृष्णमुर्ती यांच्या शिकवणुकीची खूप साथ मिळाली. बऱ्याच काळानंतर श्याम बेनेगल यांच्या त्रिकालमध्ये गोव्यातल्या कॅथलिक ख्रिश्चन कुटुंबातल्या वर्चस्व गाजविणाऱ्या कर्त्यां प्रौढ स्त्रीची मध्यवर्ती भूमिका तिने केली. १९९२ सालचा प्रदीप किशन दिग्दर्शित इलेक्ट्रिक मूनहा इंग्रजी चित्रपट त्यांचा शेवटचा चित्रपट. जेम्स आईव्हरी यांचा "The householder" (१९६३) आणि श्याम बेनेगल यांचा "त्रिकाल" (१९८५) हे लीला नायडू यांचे इतर गाजलेले चित्रपट! श्याम बेनेगल तर लीला नायडू यांच्या अभिनया बद्दल म्हणतात "It was a sheer haunting experience to work with Leela Naidu, who breethed innocence and serenity in her performance!”

परंतु, इतक्या प्रतिभाशाली अभिनेत्रीला केवळ बोटावर मोजण्या इतकेच चित्रपट मिळाले - कदाचित त्यांचे स्वतंत्र व्यक्तिमत्व आणि तेजस्वी प्रतिभा त्यांच्या प्रगतीआड आली असावी!

लीला नायडू यांचे २८ जुलै २००९ निधन झाले.

#संजीव_वेलणकर पुणे.

९४२२३०१७३३

संदर्भ.इंटरनेट

ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.

https://www.youtube.com/watch?v=2j0UDBlrq1w

 https://www.youtube.com/watch?v=lnV0CrlAs94

 https://www.youtube.com/watch?v=qWTquOOOMR0

 https://www.youtube.com/watch?v=jKolkHxbjAo

आज २८ जुलै

मराठी रंगभूमीवरील व चित्रपटातील प्रसिद्ध गायक-नट #पंडितराव_नगरकर यांचा स्मृतिदिन.

जन्म. २६ डिसेंबर १९१०

पूर्ण नाव गोविंद परशुराम नगरकर; परंतु पंडितराव याच नावाने प्रसिद्ध. लहानपणापासूनच पंडितरावांचा गायनाकडे कल होता. सुप्रसिद्ध गायक-नट विष्णुपंत पागनीस यांच्याकडे प्रथम आणि नंतर पुणे येथील भारत गायन समाजात त्यांनी शास्त्रोक्त गायनाचा अभ्यास केला. मित्रमंडळीच्या आणि चाहत्यांच्या वर्तुळात पंडितरावांनी गायिलेल्या गीतांचा बोलबाला झाल्यामुळे ओडियन कंपनीने त्यांच्या काही गीतांच्या ध्वनिमुद्रिका प्रकाशित केल्या. त्यांपैकी जा के मथुरा’, ‘बोल हसरे बोल प्यारे’, ‘रामरंगी रंगले मनइ. गीतांच्या ध्वनिमुद्रिका बऱ्याच लोकप्रिय झाल्या. आकाशवाणीच्या मुंबई केंद्राशी त्यांचा संबंध सुरुवातीपासून होता. हरिभाऊ शुक्ल यांच्या मंगला नाटकात काम करून पंडितरावांनी नाट्यसृष्टीत प्रवेश केला. पुढे सुलोचना पालकर हिच्या सहकार्याने पंडितरावांनी १९३४ साली सुलोचना संगीत मंडळीया नाट्यसंस्थेची स्थापना केली व १९३७ पर्यंत कंपनीच्या नाट्यप्रयोगांत नायकाच्या भूमिका केल्या. संशयकल्लोळ तसेच खाडिलकर यांचे संगीत त्रिदंडी-संन्यास ही नाटके सुलोचना संगीत मंडळीकरीत असे. त्यांशिवाय मृच्छकटिक, मानापमान, सौभद्र, लग्नाची बेडी, ना. सी. फडक्यांचे संजीवन इ. नाटकेही या संस्थेने रंगमंचावर आणली होती. १९३७ मध्ये कंपनी बंद पडली. नंतर दामुअण्णा जोशी यांच्या कला-विलासच्या देहूरोड या नाटकात पंडितरावांनी काम केले. त्यातील मी गातो नाचतोहे पंडितरावांचे गाणे खूपच गाजले. शेवटी १९७६ मध्ये रांगणेकरांच्या पिकली पाने या गद्य नाटकात त्यांनी भूमिका केली व ही त्यांची शेवटचीच भूमिका ठरली. लग्नाची बेडी, एकच प्याला मधल्या संगीत भुमिका ते शेवटपर्यंत करत होते. मी गातो नाचतो आनंदे.. अशी काही भावगीते पण त्यांनी गायली.

 व्ही. शांताराम यांच्या अमरभूपाळी या चित्रपटातील होनाजीच्या भूमिकेसाठी पंडितरावांनी न्याय दिला. त्या बोलपटात लता मंगेशकर आणि पंडितराव यांनी गायिलेली घनःश्याम सुंदराही भूपाळी अविस्मरणीय ठरली. मधुर आवाज, मार्दवता, तल्लीनता आणि भावमधुरता हे त्यांच्या गायनातले उल्लेखनीय गुण होते. पंडितराव नगरकर यांचे २८ जुलै १९७७ निधन झाले.

#संजीव_वेलणकर पुणे.

९४२२३०१७३३

संदर्भ.इंटरनेट

ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.

आज २८ जुलै

आज मराठी रंगभूमीवरील ज्येष्ठ नाटककार अनंत विष्णू गोखले म्हणजेच #बाबुराव_गोखले यांचा स्मृतिदिन.

जन्म.१५ सप्टेंबर १९१६

बाबुराव गोखले, राजा गोसावी, शरद तळवलकर यांनी गाजवलेलं एव्हरग्रीन अस्सल दर्जेदार विनोदी म्हणजे नाटक करायला गेलो एकत्यांचं गाजलेलं नाटक करायला गेलो एकम्हणजे मनोरंजनाचा खच्चून भरलेला मसालाच! नव्या पिढीला बाबूराव गोखले यांची नाटके परिचित नाहीत, पण किमान डझनभर नाटकांनी त्यांनी रसिकांना हसविले. त्यात करायला गेलो एकहा एक मास्टरपीसच. अन् झालं भलतच’, ‘रात्र थोडी सोंग फार’, ‘नाटक झाले जन्माचे’, ‘पतंगावरी जीवन माझे’, ‘पाप कुणाचे शाप कुणाला’, ‘ते तसे तर मी अशी’, ‘झालं गेलं गंगेला मिळालं’, ‘खुनाला वाचा फुटली’, ‘संसार पाहावा मोडून’, ‘थांबा-थांबा घोळ आहे’, ‘पुत्रवती भव’, ‘पेल्यातील वादळ…’ त्यातली ही काही नाटके. जी नावापासूनच नाट्यमय ठरलेली. आता करायला गेलो एकहे नाटक १९५५ च्या सुमारास रंगभूमीवर पुण्याच्या श्रीस्टारतर्फे आणलेलं. याच्या लेखनासोबतच दिग्दर्शन आणि भूमिकाही बाबूरावांनी केलेली. पहिल्या प्रयोगात शरद तळवलकर, शीला गुप्ते, राजा गोसावी, प्रभाकर मुजुमदार, इंदिरा चिटणीस, इंदू मुजुमदार यांच्या भूमिका होत्या. यातल्या हीरोची म्हणजे हरिभाऊ हर्षेची मध्यवर्ती भूमिका भाऊ बिवलकर यांनी केलेली. नटसम्राटनाटकातील विठोबा, ‘भावबंधनमध्ये महेश्वपरी, ‘लग्नाची बेडीतला अवधूत या भूमिका भाऊंनी केलेल्या. पुढे काही प्रयोगांत शरद तळवलकर यांनी पत्रकार शंखनाद व हरिभाऊच्या भूमिका केल्या. फिल्मस्टार राजा गोसावी यांनीही हरिभाऊची भूमिका केली होती. रवींद्र स्टार्स, श्री स्टार्स या संस्थांतर्फे त्यांनी स्वत:ची व इतर नाटककारांची नाटके रंगभूमीवर आणली. त्यांचा 'वारा फोफावला' हा कवितासंग्रह, 'करायला गेलो एक', ' संसार पाहावा मोडून', 'अन् झालं भलतंच', 'नवरा म्हणून नये आपला', 'रात्र थोडी सोंगे फार' इत्यादी नाटके प्रसिद्ध आहेत. बाबुराव गोखले यांचे २८ जुलै १९८१ रोजी निधन झाले.

#संजीव_वेलणकर पुणे.

९४२२३०१७३३

संदर्भ.इंटरनेट

ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.

गीतकार म्हणून बाबुराव गोखले यांनी लिहीलेली काही गाणी

झुंजुमुंजु झालं चकाकलं

त्या गावी त्या तिथवर

दारीच्या देवळीत जळो पणति

नटली चैत्राची नवलाई  

नाखवा वल्हव वल्हव

निरांजन पडले तबकात

प्रीत तुझी माझी कुणाला

मुशाफिरा ही दुनिया सारी

वारा फोफावला

आज २८ जुलै

आज बॉलीवूडचे पोलीस अधिकारी #जगदीश_राज यांचा स्मृतिदिन.

जन्म. १९२८

पाकिस्तानातील सरगोधा येथे जन्म झालेले जगदीश राज फाळणीनंतर भारतात स्थायिक झाले. जगदीश राज खुराणा हे जगदीश राज यांचे पूर्ण नाव.जगदीश राज यांनी दीडशेहून अधिक चित्रपटात विविध भूमिका केल्या मात्र ते पोलीसअधिकाऱ्याच्या भूमिकेत विशेष गाजले. तब्बल १४४ चित्रपटांमधून त्यांनी पोलीस अधिकाऱ्याची भूमिका वठविली होती. सिनेक्षेत्रातील २१ वर्षांच्या कारकिर्दीत एकाच प्रकारच्या व्यक्तिरेखा साकारण्याचा विक्रम जगदीश राज यांच्या नावावर आहे. त्यांच्या या भूमिकांची गिनिज् बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंद घेण्यात आली होती. बहुतांश हिंदी चित्रपटातून त्यांनी रंगविलेली पोलीस अधिकारीही भूमिका गाजली. मजदूर’, ‘इनाम धरम’, ‘गोपीचंद जासूस’, सिलसिला’, ‘बेशरम’, तुम्हारी कसम’, सुहाग’, ‘ड्रीम गर्ल’, 'गुलामी', 'असली नकली', 'विरोधी', 'चार दिन की चांदनी' आदी चित्रपटातील त्यांच्या भूमिका गाजल्या होत्या. जगदीश राज हे अभिनेत्री अनीता राज यांचे वडील. जगदीश राज यांचे २८ जुलै २०१३ रोजी निधन झाले.

#संजीव_वेलणकर पुणे.

९४२२३०१७३३

संदर्भ.इंटरनेट

ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.

आज २८ जुलै

आज ज्येष्ठ अभिनेते व थिएटर अॅकॅडमीचे संस्थापक सदस्य #नंदू_पोळ यांचा स्मृतिदिन.

जन्म. १९४८

वडिलांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळं लहान वयातच नंदू पोळ यांचा अभिनयाचा प्रवास सुरू झाला. 'साष्टांग नमस्कार' या नाटकातून त्यांनी अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं. नंदू पोळ यांनी अनेक चित्रपट, मालिका तसेच नाटकातून आपल्या अभिनयाचे प्रेक्षकांची मने जिंकली होती. नंदू पोळ यांची लहानखुरी मूर्ती घाशीराम कोतवालनाटकाच्या प्रारंभीच श्री गणराय नर्तन करीया नांदीत प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत असे. 'गाढवाचं लग्न' या सिनेमातील 'राजा'च्या भूमिकेला वेगळी ओळख नंदू पोळ यांनी मिळवून दिली. सिंहासन, सामना, एक होता विदूषक, नागिन, एक डाव भुताचा, कथा दोन गणपतरावांची, पक पक पकाक, दुर्गे दुर्गट भारी, गाढवाचं लग्न, इसराल गावाची इसराल माणसे, हसतील त्यांचे दात दिसतील या चित्रपटांतून त्यांनी काम केले होते. अनेक टीव्ही सीरियल्स आणि मालिकातूनही त्यांनी अभिनयाची चुणूक दाखवली. नाजुका, प्रवासी, अडोस-प़डोस, मुक्ती, पिंपळपान, अकलेचे तारे, कायपालट यासारख्या मालिका-टीव्ही सीरियल्समध्येही त्यांनी भूमिका साकारल्या होत्या. मराठीप्रमाणेच हिंदी, कन्नड, गुजराती चित्रपट मालिकांतही त्यांनी काम केले. डॉ. जब्बार पटेल, सई परांजपे, मणी कौल, अरुण खोपकर, स्मिता तळवलकर हे दिग्दर्शक तसेच डॉ. श्रीराम लागू, निळू फुले, ओम पुरी, नसिरुद्दीन शहा, मोहन आगाशे, नाना पाटेकर, अशोक सराफ यांच्यासोबत त्यांनी कामी केले. मराठी रंगभूमीच्या इतिहासात अनन्यसाधारण स्थान असणाऱ्या थिएटर अकॅडमीचे ते संस्थापक सदस्य आणि २० वर्षे कार्यकारी सदस्य होते. नंदू पोळ यांनी देशात अडीच हजार, तर परदेशात शेकडो नाट्यप्रयोग केले. स्वत:चा कलाप्रवास त्यांनी मी, नंदू पोळया पुस्तकातून उलगडला आहे. पोळ उत्तम ध्वनिमुद्रणतज्ज्ञ होते. त्यांच्यातल्या उत्तम ध्वनिमुद्रणतज्ज्ञतेमुळे गणेशोत्सवात मंडळांच्या देखाव्यांमागील शब्द- स्वर ध्वनिमुद्रित करण्यासाठी ते रात्र- रात्र कष्ट करत. नंदू पोळ यांनी स्वत:चा स्टुडिओही काढला होता. नंदू पोळ यांनी मी नंदू पोळया पुस्तकात त्यांचा कलाप्रवास शब्दबद्ध केला आहे. 

नंदू पोळ यांचे २८ जुलै २०१६ रोजी निधन झाले. नंदू पोळ यांना आदरांजली.

#संजीव_वेलणकर पुणे.

९४२२३०१७३३

संदर्भ.इंटरनेट

ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.

आज २८ जुलै

आज हिंदी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री #कुमकुम यांचा स्मृतिदिन.

जन्म.२२ एप्रिल १९३४ हुसेनाबाद, झारखंड बिहार येथे.

कुमकुम यांचे खरं नाव झेबुन्निसा, त्यांचे वडील सय्यद मन्सूर हसन पटणीचे नबाब होते. त्यांच्या वडिलाची हुसेनाबाद येथे खूप जमीन जायदाद होती.पण सरकारने जप्ती आणल्यावर ते पूर्ण कफल्लक झाले. मग कोलकत्ता येथे रहायला आले. कुमकुम यांना लहानपणापासून नृत्य गाणे तसेच अभिनयाची खूप आवड होती. त्यांनी पं. शंभू महाराज यांच्याकडून कथ्थकाचे शिक्षण घेतले होते. ५० च्या दशकात कुमकुम यांनी चित्रपट सृष्टीत प्रवेश केला. कुमकुम यांना पहिली संधी सोहराब मोदींनी त्यांच्या 'मिर्जा गालीब' या चित्रपटात दिली. पण कुमकुम यांना खरी ओळख मिळाली ती गुरुदत्त यांच्या 'मि & मिसेस 55' या चित्रपटातील 'कभी आर कभी पार लागा तीरे नजर' या गाण्यामुळे! या चित्रपटात कुमकुम यांनी  मध्ये गुरुदत्त यांच्या वहिनीची भूमिका केली. त्यांचे 'झेबुन्निसा' हे नाव बदलून 'कुमकुम' हे नाव गुरुदत्त यांनीच ठेवले होते. सीआयडी मध्ये त्यांनी जॉनी वॉकर च्या प्रेयसीची भूमिका केली होती.कुमकुम यांनी मिस्टर एक्स इन बॉम्बे, मदर इंडिया, सन ऑफ इंडिया, कोहिनूर, उजाला, नया दौर, श्रीमान फंटूश, एक सपेरा एक लुटेरा अशा चित्रपटात अभिनय केला होता.  कुमकुम यांनी काही भोजपुरी चित्रपटही केले आहे. कुमकुम यांनी पहीला भोजपुरी चित्रपट 'गंगा मइया तोहे पियारी चढ़ाईबो' मध्ये अभिनय केला होता.  कथक नृत्यांगना असलेल्या कुमकुम यांनी अनेक अजरामर गाण्यांना आपला मोहक चेहरा दिला होता. त्यांना 'कोहिनूर' चित्रपटातील 'मधुबन में राधिका नाचे', 'आर-पार' 'सीआईडी' चित्रपटातील 'यह है बॉम्बे मेरी जान' या गाण्यांना खूप प्रसिद्धी मिळाली होती. पण कुमकुम यांना पाच सहा चित्रपट सोडले तर मुख्य नायिका म्हणून कधीच काम मिळाले नाही. कुमकुम यांचा शेवटचा चित्रपट जलते बदन हा होता. कुमकुम यांनी ११५ हून अधिक चित्रपटात काम केले. १९५४ ते १९७३ या सुमारे दोन दशकांत त्यांनी विविध प्रकारच्या भूमिका केल्या; परंतु दीर्घकाळ चित्रपटसृष्टीत वावरण्याचे टाळून त्या रुपेरी झगमगाटापासून दूर खासगी जीवनात रमल्या. १९७३ मध्ये कुमकुम यांनी व्यावसायिक सज्जाद अकबर खान यांच्याशी विवाह केला आणि त्या सौदी अरेबिया येथे स्थायिक झाल्या. कुमकुम या अभिनेता गोविंदा यांच्या मावशी होत.

*कुमकुम यांचे २८ जुलै २०२० रोजी निधन झाले.

कुमकुम यांचे काही हिंदी चित्रपट. राजलक्ष्मी, मि & मिसेस 55, सीआयडी, मदर इंडिया उजाला, बसंत बहार, मि. एक्स इन बॉँबे, गंगाकी लहरे, श्रीमान फंटूश, दिल भी तेरा हम भी तेरे, ललकार, धमकी.

कुमकुम यांचे भोजपुरी चित्रपट. गंगा मैया तोहे पिहरी चढईबो,लागी नाही छूटे राम.

कुमकम Tabassum Talkies.

https://www.youtube.com/watch?v=D28g918fKkU

https://www.youtube.com/watch?v=z6GNohIg_XQ

आज के फनकार

https://www.youtube.com/watch?v=HHoNBC8AbO8

कुमकुम यांची गाणी....

https://www.youtube.com/watch?v=3_4FgrMnzAI

https://www.youtube.com/watch?v=L7p27AmHocg

https://www.youtube.com/watch?v=KVLvnK4VlGc

https://www.youtube.com/watch?v=MvAlwKHM12c

#संजीव_वेलणकर पुणे.

९४२२३०१७३३

संदर्भ.इंटरनेट

ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.

आज २८ जुलै

आज अभिनेत्री #आयशा_जुल्का चा वाढदिवस.

जन्म.२८ जुलै १९७२ रोजी श्रीनगर येथे.

आयशाचे वडील इंदरकुमार झुल्का हे विंग कमांडर होते. आयशाचे लहानपणापासूनच खूप लाड केले जात.

आयशाला अभिनयाची आवडही लहानपणापासूनच होती. ती आईचा दुपट्टा डोक्यावरून घेऊन आरशासमोर उभी राहायची आणि पाहिलेल्या चित्रपटातील नायिकेप्रमाणे नाच करायची आणि डायलॉग्जही बोलायची. घरातील वातावरण अत्यंत खुलेपणाचे असल्याने आयशाने हेच करावे आणि तेच करावे असा दबाव कोणी आणला नाही. तिच्या अभिनयाच्या आवडीमुळेच १९८३ मध्ये विजयेंद्र घाटगे, सारिका, कादर खान अभिनीत कैसे कैसे लोगमध्ये पूजा नावाच्या मुलीची भूमिका साकारली आणि तिचा बॉलिवूडमध्ये प्रवेश झाला. मात्र त्यानंतर ती लगेच काही चित्रपटांमध्ये दिसली नाही. आपले शिक्षण पूर्ण करून सात वर्षांनंतर म्हणजे १९९१ मध्ये तिने एका तेलुगु चित्रपटात नेती सिद्धार्थमध्ये नायिकेची भूमिका साकारली आणि तिचा नायिका म्हणून दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीत प्रवेश झाला. हिंदीमध्येही तिचा प्रवेश सलमान खानच्या नायिकेच्या रूपात दीपक बाहरी दिग्दर्शित कुर्बानचित्रपटातून झाला. चित्रपट फ्लॉप झाला असला तरी पहिल्याच चित्रपटात सलमानची नायिका बनल्याने सर्व निर्मात्यांचे तिच्याकडे लक्ष गेले होते.

त्यानंतर आयशाने कुमार गौरवच्या नायिकीची भूमिका हाय मेरी जानचित्रपटात साकारली. त्यानंतर माशूकआणि अक्षयकुमारबरोबर खिलाडीचित्रपट केला. खिलाडी हिट झाला; परंतु आयशाला खरे यश दाखवले १९९२ मध्ये आलेल्या आमिर खानच्या जो जीता वह सिकंदरने. यातील तिची अंजलीची भूमिका खूपच गाजली. त्यानंतर दोन वर्षांत म्हणजे १९९४-९५ मध्ये आयशाने बलमा, रंग, संग्राम, जयकिशन, ब्रह्मा, एक्का राजा राणी, दलाल, वक्त हमारा है- असे जवळ जवळ १५ ते १७ चित्रपट केले. मात्र नंतर तिची कारकीर्द ओसरत गेली. अत्यंत व्यस्त असलेल्या आयशाकडे निर्मात्यांनी नंतर पाठ फिरवण्यास सुरुवात केली.

याचे कारण म्हणजे काजोल, करिष्मा कपूर, मनीषा कोईराला, रवीना टंडन अशा नव्या मुली नायिका म्हणून पुढे येत होत्या. आयशा या नायिकांपुढे थोडीशी वयस्कर असल्याने निर्मात्यांनी आयशाऐवजी या नायिकांनाच प्राधान्य दिल्याने आयशाकडे चित्रपट येईनासे झाले. त्यामुळे मग पाहुणी कलाकार म्हणूनही आयशा चित्रपटांमध्ये दिसू लागली. असे करता करता २००० साल उजाडले. अनेक नव्या नायिका तोपर्यंत आल्या असल्याने निर्मात्यांनी आयशाला सहायक अभिनेत्रीच्या भूमिका ऑफर करण्यास सुरुवात केली. अभिषेक बच्चनच्या रनमध्ये तिला अभिषेकच्या बहिणीची भूमिका देण्यात आली आणि तिने ती स्वीकारलीही होती. त्यानंतर सोचा ना थामध्ये तिने वहिनीची भूमिका साकारली. ऐश्वर्याच्या उमराव जानमध्ये सहायक अभिनेत्रीची भूमिका केली. २०१० मध्ये आलेल्या अदा अ वे ऑफ लाईफमध्ये तर अत्यंत फालतू भूमिका आयशाने साकारली होती. आयशाने शेवटचा चित्रपट केला तो २०१८ मध्ये आलेला- जिनियस. निर्माता-दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी केलेला आग्रह तिला मोडवला नाही आणि तिने नायकाच्या आईची भूमिका साकारली. त्यानंतर मात्र ती चित्रपटांमध्ये दिसली नाही. नेपोटिझमबाबत आता बोलले जात आहे. सनी देओलच्या नरसिम्हामध्ये आयशा नायिका होती. परंतु शूटिंगच्या आदल्या रात्री तिला चित्रपटातून काढून टाकल्याचा मेसेज देण्यात आला. आपल्या उमेदीच्या काळात आयशाचे नाना पाटेकर, मिथुन चक्रवर्ती, अरमान कोहली यांच्याबरोबर प्रेम जुळले होते. परंतु या तिघांबरोबरचे तिचे प्रेम लग्नापर्यंत पोहचले नाही. त्यानंतर आयशानं प्रख्यात उद्योगपती बिल्डर समार वशी याच्याबरोबर लग्न केले. सॅमरॉकनावाची पतीच्या कंपनीची जबाबदारी आयशा सांभाळत आहे. यासोबतच आयशाने अॅडिशन्स नावाचा फॅशन ब्रॅन्ड आणि अनंता नावाच्या स्पाची चेनही सुरू केली. हे तिन्ही व्यवसाय ती उत्कृष्टपणे सांभाळत आहे.

सं|जी|व वे||||र पुणे.

९४२२३०१७३३

संदर्भ.इंटरनेट

ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.

आज २८ जुलै

२८ जुलै १९६५ रोजी #वक्त_चित्रपट रिलीज झाला याला आज ५६ वर्षे झाली.

काळाचा अगाध महिमा दर्शविणाऱ्या वक्तची कथा अख्तर मिर्जानी लिहिली होती. मिर्जाचे फाळणीपूर्वीचे आयुष्य पाकिस्तानच्या सरहद्दीवरच्या क्वेट्टा शहरात गेले होते. त्या ठिकाणी स्वातंत्र्यपूर्व काळात केदारनाथ अॅतण्ड सन्स नावाची कारपेट तयार करणारी मोठी फर्म होती व क्वेट्टाच्या भूकंपाच्या तडाख्यात इतर अनेक कुटुंबांसारखी यांचीही वाताहत झाली होती. पुढे अनेक वर्षांनी, योगायोगाने त्या कुटुंबातील सदस्य परत एकत्र आले होते. या घटनेवरच वक्तच्या कथेची त्यांनी उभारणी केली होती.

बी आर चोप्रांचे बालपणही लाहोरला गेले असल्यामुळे, त्यांना या कथाविषयात विलक्षण रुची निर्माण झाली. वक्तच्या कथेवर बिग मल्टिकास्ट घेऊन, भव्यदिव्य अशा रंगीत चित्रपटाची निर्मिती करण्याचे त्यांनी ठरविले. वक्तच्या कथेला त्यांनी कोर्टरूम नाटय़, खुनाचे रहस्य व दैववादाची जोड दिली. पटकथा व संवाद अमजदखान यांचे सासरे अख्तर उल इमान यांचे होते. पृथ्वीराज कपूर त्यांचे फार वर्षांपासूनचे मित्र होते. तेव्हा त्यांनाच लाला केदारनाथची मध्यवर्ती भूमिका देऊन, त्यांच्या तीन मुलांना घेऊन वक्तची निर्मिती करण्याच्या विचारात चोप्रा होते. यासाठी ते पृथ्वीराजजी व शम्मी कपूरला भेटूनही आले. त्या काळातील नामवंत निर्माते मेहबूब खान, राज कपूर, के. आसिफ, विमल राय, स्वत: चोप्रा धंद्यामध्ये एकमेकांचे प्रतिस्पर्धी असले तरी त्या सर्वामध्ये मित्रत्वाचे संबंध होते. ते नेहमी एकमेकांची मदत, सल्ला घेत असत. त्यामध्ये कधी कुणाला कमीपणा वाटत नसे. त्यांचे विविध विषयांवरचे चित्रपट एकाच वेळी प्रदíशत होऊन रजत जयंती साजरी करीत असत. वक्तची कथा चोप्रांनी विमल रॉयना वाचून दाखविली होती. एका सकाळी बिमल रायचा चोप्रांना फोन आला. सुना है आपने, वक्त में लाला केदारनाथ के रोल के लिये पृथ्वीराजजी को लिया है और साथ में उनके तीनों लडके भी काम कर रहे हैं. मैने आपकी स्टोरी सुनी है, मुझे नहीं लगता कि दर्शक कभी विश्वास करें कि कपूर बाप-बेटे या भाई-भाई, आमने सामने आने पर एक दुसरे को पहचान नहीं पाते है. ये तो सरासर गलत होगा.चोप्रांना आपली चूक ताबडतोब उमगली. त्यांनी बिमल रायचे आभार मानले व पृथ्वीराजजींना हा मुद्दा समजावून सांगितला. त्यांनाही ते पटले. अशा रीतीने कपूर कुटुंबीयांना घेऊन वक्तकरण्याचे रहित करण्यात आले.

बलराज सहानी लाहोरच्या सरकारी महाविद्यालयात बी आर चोप्रांचे सहअध्यायी होते. बलराजजी शेवटच्या वर्षांला, तर बी आर चोप्रा पहिल्या वर्षांला होते. पुढे अनेक वर्षांनी पंजाब असोसिएशनच्या दिल्लीतील एका कार्यक्रमात त्या दोघांची परत एकत्र गाठ पडली. बलराज सहानींनी हसत हसत विचारले, ‘क्या भाई आज कल आप अच्छी अच्छी फिल्मे बना रहा है. क्या आप अपने कॉलेज के पुराने दोस्त को भूल गये? क्या आपकी पिक्चर में मेरे लिए कोई भी रोल नहीं?’ बलराजजींचा हा प्रश्न ऐकून चोप्रा क्षणभर गांगरले, स्वत:ला सावरत म्हणाले, ‘नहीं, नहीं, ऐसी कोई बात नहीं. कॉलेज में आप मेरे सीनिअर थे और फिल्मों में भी आपने बडम्ी सफलता हासिल की है. मेरे दिल में ये बात जरूर थी, बल्कि मं आपसे अनुरोध करने के लिये कतरता था. क्या आप मेरी वक्तफिल्म में लाला केदारनाथ की भूमिका अदा करेंगे?’ बलराज सहानी यांनी खुशीने होकार दिला. बी आर चोप्रांनी विचारले, ‘इस भूमिका के लिये आपको कितने पसे देने पडेंगे?’ सहानी म्हणाले, ‘यार तू भी क्या पूछता है? तुझे जो देना है, दे दे. मं तेरी पिक्चर में जरूर काम करूंगा.अशा प्रकारे लाला केदारनाथची भूमिका त्यांनी बलराज सहानींना दिली.

राजकुमारला तर चोप्रा तो पोलीस ऑफिसर असल्यापासून ओळखत होते. त्याच्या हट्टी व हेकेखोर स्वभावामुळे त्यांनी धूल का फूलमध्ये राजकुमार ऐवजी राजेंद्रकुमारला घेतले होते. राजकुमारला आपली चूक उमगल्यामुळे तोही निवळला होता. वक्तमधील राजाच्या भूमिकेसाठी चोप्रांना राजकुमारच अगदी योग्य वाटत होता. वास्तविक राजाचा रोल करण्याची धर्मेद्रची इच्छा होती. तोही पंजाबातील असल्याने चोप्रांचे नि त्याचे जवळचे संबंध होते. परंतु का कोणास ठाऊक, राजाच्या व्यक्तिरेखेला धर्मेद्र उचित न्याय देऊ शकणार नाही असे चोप्रांना वाटले. त्यांनी आपल्या पुढच्या चित्रपटात, ‘आदमी और इन्सानमध्ये धर्मेद्रला संधी दिली व राजकुमारची वक्तसाठी निवड केली. सुनील दत्त, शशी कपूरविषयी प्रश्नच नव्हता. त्यांनी पूर्वी बी आर च्या बॅनरखाली काम केले होते. बाकी जीवन, मनमोहन कृष्ण, रहमान, शशिकला वगरे त्यांची जुनीच टीम होती. वक्तचे निर्देशन त्यांनी आपल्या छोटय़ा भावाकडे - यश चोप्रांकडे - सोपविले व सिनेमॅटोग्राफर म्हणून त्यांनी धरम चोप्रांना घेतले. साहिर लुधियानवी व रवी ही जोडी वक्तमध्येही होती. वक्तची जोरात तयारी चालू झाली. एक दिवस सकाळी बी. आर. चोप्रा धरम चोप्रांच्या हातात काही फोटो देत म्हणाले, ‘ये साधना है, इस फोटो में कैसी सुंदर लगती है. अपने पिक्चर में भी वो ऐसी ही लगनी चाहिए.’ (‘मेरे मेहबूबच्या यशामुळे साधनाचे बरेच नाव झाले होते. वक्तच्या नायिकेच्या भूमिकेसाठी तिचा विचार सुरू झाला होता.) चोप्रांची ती सूचना ऐकून धरमजी मनातल्या मनात हसले. वास्तविक साधनाचे ते सर्व फोटो धरमजींनीच काढले होते. चोप्रा वक्तची निर्मिती करतात हे ऐकल्यावर स्वत: साधना धरमजींना भेटायला आली होती. धरमजींनी तिला नम्रपणे सांगितले, ‘आर्टस्टि का सिलेक्शन तो मेरे बडे भाई बलदेवजी करते हैं. मं तो सिर्फ सिनेमॅटोग्राफर हूं. आप यदि चाहे तो मं आपकी स्क्रीन टेस्ट करा सकता हूं.तिने धरमजींकडून फोटो काढून घेतले व तेच फोटो चोप्रांना दाखविले. वास्तविक यापूर्वी धरमजींनी कधीही रंगीत चित्रपट केला नव्हता. त्यांनी चोप्रांना पदोपदी विनवून सांगितले, तुम्ही दुसरा कुणीतरी अनुभवी सिनेमॅटोग्राफर घ्या, मी त्यांचा साहाय्यक बनतो. परंतु चोप्रा त्यांचे काही ऐकून घ्यायला तयार नव्हते. ते म्हणाले, ‘तुला काळाप्रमाणे बदलावे लागेल! कधीतरी तुला रंगीत चित्रपट बनवायचा आहेच ना, मग हाच का नको? ‘वक्तची जबाबदारी तुलाच घ्यावी लागेलधरमजींनी ते मुकाटय़ाने मान्य केले. वक्तमध्ये सुरुवातीलाच चिनॉय सेठ (रहमान) बरोबर राजकुमार चा खटका उडतो. बाजूला उभा असलेला गुंड बनलेला मदनपुरी खिशातून चाकू काढून राजकुमारला धमकाविण्याचा प्रयत्न करतो.

वक्तच्या प्रत्येक फ्रेममध्ये चोप्रा बंधूंचा परीसस्पर्श जाणवतो. मग ती लाला केदारनाथची जुन्या काळातील, सलवार, कुडता, जाकीट, फेटा व टाय अशी खानदानी, पारंपरिक वेषभूषा असो की राजाची एन्ट्री असो.

अभिनेता राजकुमारला फिल्मी उद्योगात राजकुमारचा दर्जामिळवून देणारे पहिले निर्माते, निर्देशक कोण असतील तर ते चोप्रा बंधू. वक्तच्या आधी जवळजवळ दहा वष्रे फिल्मी दुनियेत असूनही राजकुमार कुठेही आपला वेगळा ठसा उमटवू शकला नव्हता. नायिकेबरोबर संवाद बोलताना तो बावरलेला वाटायचा, प्रणयदृश्यात तर तो जोकर वाटायचा, त्याला पडद्यावर नाचताना पाहून डोळे बंद करून घेण्याचा मोह व्हायचा. त्याच्या व्यक्तिमत्त्वाशी विसंगत भूमिका त्याला मिळत गेल्याने कदाचित असे घडत असावे. जसा तुमसा नहीं देखामध्ये शम्मीचा झाला, तसा वक्तमध्ये राजकुमारचा पुनर्जन्म झाला. त्याला आवाजाची नसíगक देणगी होती. त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा, आवाजाचा योग्य उपयोग करून हीरोचा उपमर्द न होता प्रत्येक फ्रेममध्ये, राजकुमारच्या बेजोड अभिनयाचा ठसाही उमटला पाहिजे हे तंत्र चोप्रांनी वक्तमध्ये यशस्वीरीत्या राबविले. प्रेक्षकांना बंडखोर व्यक्तिमत्त्व नेहमीच भुरळ पाडीत आले आहे. अनाथाश्रमाचा संचालक (जीवन) छोटय़ा राजाचा अनन्वित छळ करतो. त्याच्या जुलमांनी छोटा राजा दबून न जाता उलटा बेडर बनतो. दुसऱ्याविषयीचा त्याला आदरभाव नष्ट होतो. तो उर्मट बनतो. निर्देशन करताना चोप्रांनी राजकुमारला त्याची व्यक्तिरेखा नीट समजावून सांगितली. तू टेढम आदमी है. आदमी की पहचान उसकी चाल से होती है. टेढम्े आदमी की चाल भी टेढम्ी होनी चाहिए, मं तुम्हारी अॅमिक्टग नहीं बल्कि चाल पहले देखूंगा. उसमें हमें कॉन्फिडन्स दिखना चाहिए. आप शहर के जानेमाने चिनॉय सेठ से टक्कर ले रहे हो. आपकी पहचान आप के जूतों से होगी.सतत एक महिना त्यांनी राजकुमारला चालायला व बोलायला शिकविले व पहिला शॉट त्याच्या जूत्यांवरघेतला.

अलीकडे म्हणजे गेल्या २५ वर्षांपासून शोलेआल्यावर संवादाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले. सलीम-जावेद कथा-पटकथा लिहून एखाद्या स्टारपेक्षाही मोठे झाले. परंतु तसे पाहिले गेल्यास वक्तनेच सर्वात आधी डायलॉगला इतके महत्त्व प्राप्त करून दिले. राजकुमारचा निधडय़ा छातीचा बेडरपणा, एखाद्या बाणासारखी, समोरच्या सराईत बदमाशाला घायाळ करणारी, खर्जातली संथ आवाजाची, परंतु भेदक शब्दफेक ऐकताना मी मी म्हणणारे सुद्धा थंडगार पडत असत. त्या आवाजामध्ये मग्रुरी, आत्मविश्वास व नसíगक बेडरपणा यांचे विलोभनीय मिश्रण होते.

वक्तमध्ये सुरुवातीलाच चिनॉय सेठ (रहमान) बरोबर त्याचा खटका उडतो. बाजूला त्याचा गुंड साथीदार मदनपुरी उभा असतो. मदनपुरी खिशातून चाकू काढून राजकुमारला धमकाविण्याचा प्रयत्न करतो. (आजच्यासारखा त्या काळी पिस्तुलांचा जमाना नव्हता.) राजकुमार उपरोधिकपणे फक्त हसतो व त्याच्याजवळ जाऊन हातातील उघडा चाकू काढून घेत म्हणतो, ‘ये चाकू है, बच्चों की खेलने की चीज नहीं, हाथ कट जाय तो खून निकल आता है.चाकू हवेत उडवितो, एक तुच्छतापूर्वक नेत्रकटाक्ष टाकतो व रुबाबात निघून जातो. दुसऱ्या एका दृश्यात तो चिनॉय सेठला सुनावतो, ‘जिनके अपने घर शीशों के हो वो दुसरों पर पत्थर नहीं फेका करते.पुढे चिनॉय सेठ राजाला खुनाच्या केसमध्ये गुंतवितो. तेव्हा कोर्टात बचावासाठी आता वकील कोण करायचा ते ठरविताना नायिका साधनाला तो सहजगत्या म्हणून जातो, ‘वैसे तो आज तक मं अपनी जिंदगी में जुआ ही खेलते आया हूं, चलो ये एक दांव और सहीं, लेकिन रवी (सुनील दत्त, त्याचा भाऊ) अगर ये मुकदमा जीत जाए तो नामी वकील बन सकता है ना?’ राजकुमारचा या चित्रपटात निगेटिव्ह रोल असूनही या डायलॉगने तो एका रात्रीत हीरो झाला.

वक्तचित्रपटाच्या यशात गीत व संगीताचा मोठा वाटा आहे.

आदमी को चाहिए वक्त से डर कर रहे, कौन जाने किस घडी वक्त का बदले मिजाज

या शीर्षकगीतात साहिरने काळाचे महत्त्व विशद करून सांगितले तर,

ए मेरी जोहरा जबीं तुझे मालूम नहीं,

तू अभी तक है हसीं और मं जवां,

तुझ पे दिल कुर्बान मेरी जान मेरी जान

या गाण्यात बलराज सहानींनी खूप रंगत आणली आहे. हाच पॅटर्न पुढे अनेक चित्रपटात पाहायला मिळतो. आशा भोसलेंनी गायिलेले साहिरचे,

कौन आया की निगाहों में चमक जाग उठी,

दिल के सोए हुए तारों में खनक जाग उठी

हे गाणे ऐकताना साहिरच्याच बाजीमधील, ‘ये कौन आया की मेरे दिल की दुनिया में बहार आयीगाण्याची आठवण ताजी होते. यातील साहिरच्या समर्थ लेखणीतून उतरलेले, रवींनी संगीतबद्ध केलेले सर्वागसुंदर गाणे होते,

अनजाने सायों का राहों में डेरा है,

अनदेखी बाहों ने हम सबको घेरा है,

यह पल उजाला है बाकी अंधेरा है,

यह पल गंवाना न यह पल भी तेरा है,

जीनेवाले सोच ले यही वक्त है कर ले पूरी आरजू,

आगे भी जाने न तू पीछे भी जाने न तू

लॉस्ट अॅनण्ड फाऊंडफॉम्र्युल्यावर अनेक चित्रपटांची निर्मिती झाली असली तरी चोप्रांचा वक्तकायमचा स्मरणात राहतो. १९६६ मध्ये वक्तला फिल्मफेअरचे सर्वोत्कृष्ट निर्देशक यश चोप्रा, साहाय्यक अभिनेता राजकुमार, कथा एफ. ए. मिर्जा असे तीन मानाचे पुरस्कार मिळाले. आपल्या पहिल्याच रंगीत चित्रपटासाठी धरम चोप्रांना उत्कृष्ट फोटोग्राफीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.

वक्त चित्रपटाचे कलाकार. बलराज सहानी, अचला सचदेव, राजकुमार, सुनील दत्त, शशी कपूर, साधना, शर्मिला टागोर, मदन पुरी, रहेमान, मोतीलाल, मनमोहन कृष्ण, जीवन, लीला चिटणीस.

वक्त चित्रपट

https://www.youtube.com/watch?v=nLXj4Ez8X0Y

वक्त चित्रपट गाणी

https://www.youtube.com/watch?v=3JzycojhW6E

अरुण पुराणिक

 #संजीव_वेलणकर पुणे.

९४२२३०१७३३

संदर्भ.इंटरनेट

ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.

संदर्भ. इंटरनेट

ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.

आज २८ जुलै

आज जेष्ठ अभिनेत्री #अनुराधा_राजाध्यक्ष यांचा वाढदिवस.

जन्म.२८ जुलै नाशिक येथे.

अनुराधा राजाध्यक्ष या माहेरच्या कीर्ती मोडक. अनुराधा राजाध्यक्ष यांचे मा रा सारडा कन्या विद्या मंदिर  येथे शालेय शिक्षण व बी वाय के कॉमर्स कॉलेज येथून महाविद्यालय शिक्षण आणि एन बी टी लॉ कॉलेज मधून वकिली चे शिक्षण झाले. कालचक्रया नाटकपासून त्यांच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात झाली. सुख पाहता, वरून सगळेच सारखे, प्रियतमा यासारख्या व्यावसायिक नाटकांचा त्या एक भाग बनल्या.  तसेच अनुराधा राजाध्यक्ष  यांनी फेअर अँड लव्हली, रिन शक्ती, उजाला, बादाम हेअर ऑइल यासारख्या बऱ्याच जाहिराती त्यांनी साकारल्या आहेत. स्टार प्रवाहवरील नकळत सारे घडलेमधील त्यांनी साकारलेली भूमिकाही प्रेक्षकांच्या तितकीच पसंतीस उतरली आहे. वादळवाट, रेशीमगाठी, श्री तशी सौ, विवाहबंधन, १०० डेज यांसारख्या मालिकाही त्यांनी साकारल्या आहेत. कुछ खोया कुछ पाया ही मालिकाही त्यांनी साकारली आहे. यासोबत तुला कळणार नाही, ती सध्या काय करते, फुगे, विठ्ठला शपथ या चित्रपटातही त्यांना अभिनयाची संधी मिळाली. एवढेच नाही तर त्या एक उत्तम कथक विशारद आहेत. त्यासाठी त्यांना सूर सिंगर संसद चा सिंगार मणी पुरस्कार मिळाला आहे, व त्यांच्या अभिनय सामाजिक कार्याच्या कामाबद्दल त्यांना तेजस्विनी पुरस्कारानेदेखील सन्मानित करण्यात आले आहे. यासोबतच त्या एक उत्तम लेखिका देखील आहेत. अनेक चित्रपट आणि मालिकेसाठी त्यांनी कथानक लिहिण्याचे काम केले आहे. मालिका, चित्रपट गीते देखील त्यांनी रचली आहेत. त्यापैकी रेशीमगाठीया मालिकेचे शीर्षक गीत त्यांचे आवडते गीत आहे. याशिवाय पेपरमध्ये देखील त्यांनी लेख लिहिण्याचे काम केले आहे. अनुराधा यांचे तिसरे पुस्तक संवाद स्वतःशीप्रकाशित देखील झाले आहे. अनुराधा राजाध्यक्ष यांचा यू ट्यूब चॅनेल असून त्यात त्या अनेक सामाजिक विषयांवर भाष्य करत असतात. 5 Minute Ka Break, इतना तो हम कर ही सकते हैं असे सांगत त्या छोट्या छोट्या गोष्टीं तून समाज हिताचे बदल सुचवतात.

अनुराधा राजाध्यक्ष यांच्या पतीचे नाव अभय राजाध्यक्ष होय. अभय राजाध्यक्ष हे युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये कार्यरत होते. याशिवाय ते ऍड प्लस पॉईंटचे डायरेक्टर आहेत. अनुराधा आणि अभय राजाध्यक्ष यांना अभिराज आणि अनुराज नावाची दोन मुले आहेत.

यू ट्यूब चॅनेल लिंक. https://www.youtube.com/channel/UCLmcrMPEvc5bGTgcaQqnstQ

#संजीव_वेलणकर पुणे.

९४२२३०१७३३

संदर्भ.इंटरनेट

ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.

 

No comments:

Post a Comment